हक्कभंग नोटीस प्रकरणी ; राऊतांचे पत्राद्वारे उत्तर !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । २० मार्च २०२३ । राज्यात अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु असतांना विधीमंडळाला कथित स्वरुपात अपमान केल्याप्रकरणी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना हक्कभंग समितीनं नोटीस पाठवली आहे. या नोटिसीला राऊतांनी पत्राद्वारे उत्तर दिलं आहे.  यामध्ये आपण विधीमंडळाचा कुठलाही अपमान केलेला नाही, असं सांगताना आपल्याविरोधात रचलेला हा विरोधकांचा डाव आहे, असा आरोपही त्यांनी यातून केला आहे.

पत्रातून संजय राऊतांनी हक्कभंग समितीला विरोध केला आहे. त्यांनी म्हटलं की, “हक्कभंग समिती ही स्वतंत्र तसेच तटस्थ स्वरुपाची असणं अपेक्षित होतं, पण समितीत फक्त माझ्या राजकीय विरोधकांना स्थान दिलं आहे, हे संसदीय लोकशाही परंपरेला धरुन नाही. या समितीत इतर सर्व पक्षांच्या प्रतिनिधींना स्थान आहे पण ठाकरे गटाच्या एकाही प्रतिनिधीला यामध्ये नाही, याची चर्चा सुरुवातीपासूनच होती. याचवरुन संजय राऊत यांनी आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळं या समितीत आता ठाकरे गटाचा कोणी प्रतिनिधीचा समावेश होईल का हे पहावं लागणार आहे. यावर विधानसभा अध्यक्ष काय निर्णय घेतात त्यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून असतील.

विधीमंडळाबद्दल मला कायमच आदर राहिला आहे. विधीमंडळाची अप्रतिष्ठा होईल असं कोणतंही विधान मी केलेलं नाही. तरीही माझ्याविरोधात हक्कभंगाची कारवाई करणं हा विरोधकांचा डाव आहे, पण यावर माझी काही हरकत नाही. पण माझं विधान नेमकं काय होतं ते ही पाहा. आम्हाला सगळी पदं शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी दिली आहेत. त्यांनीच शिवसेना निर्माण केली आहे. त्यामुळं सध्याच डुप्लिकेट शिवसेनेचं मंडळ हे विधीमंडळ नसून चोरमंडळ आहे, असं संजय राऊत यांनी उत्तर देताना म्हटलं आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम