राज ठाकरेंनी शिवसेना सोडताना काय मागितले ; मुख्यमंत्री शिंदे !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । २० मार्च २०२३ । राज्यातील ठाकरे व शिंदे गटातील वाद आता सर्वश्रुत झालेला असला तरी दोन्ही गटाकडून सभेमध्ये गोप्यस्फोट करण्यात येत आहे. खेड येथील सभेतून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर जोरदार टीकास्त्र डागले आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे, मनसे प्रमुख राज ठाकरेंसह 40 आमदार आणि 13 खासदार यांनी शिवसेना सोडण्यासाठी उद्धव ठाकरे कारणीभूत असल्याचा ठपका त्यांनी ठेवला आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, शिवसेना सोडण्याआधी राज ठाकरे काय मागत होते? जिथे शिवसेना नाही, जिथे शिवसेनेचे संघटन कमकुवत आहे, तो भाग मला द्यावा मी तिथे शिवसेना वाढवतो, आणि पक्षाचा विस्तार करताे असे राज ठाकरेंनी म्हटले होते. नारायण राणेंचा काय गुन्हा होता? मात्र, उद्धव ठाकरेंना कार्यकर्ते मोठे झालेले सहन होत नाही, असा आरोप उद्धव ठाकरेंवर केला. आम्ही त्या क्षणांचे साक्षीदार आहोत असेही त्यांनी काल जाहीर सभेत म्हटले. पूर्वी आमच्यावर बंधने होती. मात्र, आता आम्हाला सर्व जण भेटतात बोलतात असेही त्यांनी म्हटले आहे.

सीएम शिंदे म्हणाले की, गुहागर विधानसभेच्या निवडणुकीत उद्धव ठाकरेंमुळेच आपला पराभव झाला असे मत रामदास कदम यांनी व्यक्त केले. याला दुजोरा देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रामदास कदम आणि यागेश कदम यांना संपविण्यासाठी दोन नगरपालिका राष्ट्रवादी काँग्रेसच्या धश्यात घातल्या याचा मी स्वत: साक्षीदार आहे. जसे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांना स्टेजवरुन खाली उतरवले होते तसाच कट रामदास कदमांच्या बाबतीत रचण्यात आला होता. त्यावेळी मीच रामदास कदमांना शिवसेनेच्या मेळाव्याला येऊ नये असे सांगितले होते.
सीएम शिंदे म्हणाले की, ठाणे मनपाच्या वेळी मी राज ठाकरेंची भेट घेतली होती. त्यांना विनंती केली होती, की बाळासाहेबांचा भगवा फडकला आहे. त्यासाठी राज ठाकरेंनी आम्हाला पाठिंबा दिला हे देखील त्यांना पटले नव्हते. त्यावेळी बाळासाहेबांना सांगावे लागले एकनाथ स्वत: साठी तिकडे गेला नव्हता असे अनेक गंभीर आरोप त्यांनी खेडच्या सभेत केले.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम