‘या’ अभिनेत्याच्या भावासमोर अंडरवर्ल्डचा डॉन कापायचा थरथर !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । २४ जून २०२३ ।  मराठी असो वा हिंदी चित्रपटामध्ये नेहमीच आपल्या वेगवेळ्या भुमिकेमुळे प्रत्येक प्रेक्षकांच्या पसंतीत उतरलेले नाना पाटेकर यांचे अनेक लोक चाहते आहेत. त्यांनी मराठीसह हिंदी सिनेइंडस्ट्रीही चांगलीच गाजवली आहे. त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. मातीशी नाळ जोडलेला ‘आपला माणूस’ अशी नानांची ओळख आहे. मात्र तुम्हाला ही गोष्ट माहितीये का? नाना पाटेकर यांचा भाऊ अंडरवर्ल्डचा डॉन होता. आता तुम्ही म्हणाल कोण? तर त्यांच्या मामेभाऊचं अंडरवर्ल्डशी कनेक्शन होते आणि त्याला दाऊदही घाबरायचा.

अभिनेते नाना पाटेकर यांच्‍या आईचं माहेरचं आडनाव सुर्वे. रमण सुर्वे हा त्‍यांचा सख्खा धाकटा मामा. मुंबईतील कुख्‍यात गुंड मन्या सुर्वे हा त्‍यांचा मामेभाऊ. नानांवर त्याचे सावट पडू नये, म्हणून लहानपणीच त्‍यांच्‍या आईने त्‍यांना मुंबईतून मुरुडला गावी घेऊन गेली. मनोहर ऊर्फ मन्‍या सुर्वे हा मुंबईतला कुप्रसिद्ध डॉन होता. त्‍याच्‍या आयुष्‍यावर ‘शुट आऊट अॅट वडाळा’ हा हिंदी चित्रपटही बनला. मुंबईतील एका मध्यमवर्गीय कुटुंबात त्‍याचा जन्‍म झाला. कीर्ती कॉलेजमधून त्याने बीए केले. मात्र, आपला सावत्र भाऊ भार्गवमुळे तो गुन्‍हेगारी विश्वात आला. त्‍याने त्याच्या कॉलेजमधील मित्रांनाही गँगमध्ये सामील करून घेतले. भार्गवचा मुंबईतल्या दादरमध्ये मोठा दरारा होता. मन्या सुर्वेने पहिला खून केला तो १९६९ साली दांडेकर नावाच्या व्यक्तीचा. या प्रकरणी त्याला जन्मठेपेची शिक्षा झाली आणि पुण्याच्या येरवडा तुरुंगात रवानगी झाली होती. मात्र तिथून त्‍याने पळ काढला आणि पुढे पोलिसांच्‍या एन्‍काउंटरमध्‍ये तो ठार झाला.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम