राजकीय खळबळ : पंकजा मुंडे यांना दोन पक्षाच्या ऑफर !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । २४ जून २०२३ ।  राज्याच्या राजकारणातून भाजपमधील अनेक नेत्यांना गेल्या दोन वर्षापासून डावलले जात होते. यावर आता थेट भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना थेट दोन पक्षांनी ऑफर दिल्याच्या बातम्या आज येवू लागल्या आहे. भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांची भाजपमध्ये होत असलेली घुसमट लपून राहिलेली नाही. काल त्यांना के. चंद्रशेखर राव यांच्या बीआरएस पक्षाने ऑफर दिली होती. आज औवेसी यांनी माध्यमांशी बोलतांना एमआयएमने दिलेल्या ऑफरबद्दल माहिती दिली आहे.

२०१९ आणि त्याही पूर्वीपासून पंकजा मुंडे यांना भाजपमधून अंतर्गत विरोध होत आलेला आहे. हा विरोध भागवत कराड यांना केंद्रात राज्यमंत्रीपद दिल्यांतर उफाळून आला. कराडांऐवजी प्रितम मुंडे यांना मंत्रिपद मिळेल, अशी शक्यता होती. परंतु भाजपने खेळी केली. त्यानंतर अनेकदा पंकजांना डावलण्यात आलं. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पंकजा मुंडे यांच्यातील वितुष्ट लपून राहिलेलं नाही. त्यातच काल त्यांना महाराष्ट्रात रुजू पाहणाऱ्या बीआरएस पक्षाने ऑफर दिली. बीआरएसचे समन्वयक बाळासाहेब सानप म्हणाले की, गोपीनाथ मुंडे यांनी देशभरात भाजप वाढवण्याचं काम केलं. परंतु आज त्यांची मुलगी पंकजा यांच्यावर वारंवार अन्याय होत आहे. त्यामुळे आम्ही पंकजा मुंडे यांना पक्षामध्ये घेण्यासाठी चर्चा करु, केसीआर त्यांना नक्कीच मुख्यमंत्री पदाचा चेहरा बनवतील. यावर पंकजा मुंडे यांची काहीही प्रतिक्रिया आलेली नाही.

मात्र आज एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसींनी माध्यमांशी बोलतांना सांगितलं की, आम्ही दोन वर्षे आधीच पंकजा मुंडे यांच्याशी बातचित केली होती. इम्तियाज जलील यांना याची कुणकुण लागली. त्यामुळे त्यांनीच त्यांच्याशी बोलणी केली परंतु त्यांनी यात लक्ष घातलं नाही. ओवैसींच्या या दाव्याने राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. एक तर पंकजा मुंडे यांचं शिवसेनेशी जवळीकतेचं नातं आहे. त्यात त्यांना या पक्षातून तर कधी त्या पक्षातून ऑफर येत राहतात. मागच्या आठवड्यात तर त्यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाच्या चर्चा रंगल्या होत्या. मात्र अद्यापही पंकजा मुंडे यांनी कुठलाही निर्णय घेतलेला नाही.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम