जळगावात नारीशक्ती एकवटल्या : जिल्हाधीकारीना दिले निवेदन !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । २४ जुलै २०२३ ।  देशातील मणिपूर राज्यात सुरु असलेला हिंसाचार व महिलांवर होत असलेल्या अत्याचारातील आरोपींना कठोर शासन होवून फाशी द्यावी या मागणीसाठी आज दि. २४ रोजी जळगाव शहरातील नारीशक्ती बहुउद्देशीय संस्थेच्या महिला पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांची भेट घेवून निवेदन दिले आहे.

निवेदनात म्हटले आहे कि, भारत देशातला अतिशय लज्जास्पद व घृणात्मक प्रकार म्हणजे मणिपूर येथील घटना, दोन महिला भगिनिंची एका जमावाकडून निर्वस्त्र करून धिंड काढण्याचा भीषण प्रकार दिनांक ४ मे रोजी कंगपोकपी गावात घडला. या भगिनींवर अमानुष आणि जाहीर सामूहिक अत्याचार करण्यात आला. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यावर सर्व देश जागी झाला. एक प्रकारे हा अत्याचार आज भारतमातेच्या लेकींवर झालेला आहे. घटना घडण्यास अडीच महिने उलटूनही आरोपींवर कोणत्याही प्रकारची कारवाई झालेली नाही ते मोकाट सुटले आहेत.जर त्यांच्यावर कारवाई झाली नाही तर पुन्हा असे आरोपी तयार होउन बेफाम सुटतील, व पुन्हा कुणाची लेक असेल तर कुणाची बहीण, ही घटना पप्रचंड अस्वस्थ करणारी असून या घटनेची पाठराखण केली जात असल्याचे निदर्शनास येत आहे.म्हणूनच समस्त महिला वर्गाकडून या घटनेचा निषेध व्यक्त करण्यात येत असून आरोपींना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे ही मागणी असलेले निवेदन नारीशक्ती बहुउद्देशीय संस्था जळगाव तर्फे नूतन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांना देण्यात आले. यावेळी नारीशक्ती बहुउद्देशीय संस्था जळगाव अध्यक्ष मनीषा पाटील व सर्व पदाधिकारी यांनी दिले या प्रसंगी नारीशक्तीच्या खजिनदार एडवोकेट सीमा जाधव, नुतन तासखेडकर, रेणुका हिंगु, नेहा जगताप, वंदना मंडावरे, अर्चना पाटील, मंजुषा अडावदकर, इंदिरा जाधव, भारती कापडणे, हर्षा गुजराती, नीता वानखेडकर ,विद्या जकातदार , मीनाक्षी शेजवळे, हर्षाली तिवारी, सोनम पाटील, कांचन पाटील ,लिना पाटील उपस्थित होत्या.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम