गजब मागणी : वाढदिवस झाला आता गिफ्ट द्या ; ठाकरे गटाचे नेते !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । २४ जुलै २०२३ ।  राज्यातील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांचा वाढदिवस दोन दिवसांपूर्वी झाला. दोघांचा वाढदिवस एकाच दिवशी साजरा करण्यात आला. वाढदिवसानिमित्त दोघांना सर्व स्तरातून शुभेच्छा मिळाल्या. सध्या विधानसभेचं अधिवेशन सुरू आहे. अधिवेशनातही निधीचा मुद्दा गाजत आहे. निधी आणि वाढदिवसाचे निमित्त साधून अनिल परबांनी दोन्ही उपमुख्यमंत्र्यांकडे निधीची मागणी केली.

अनिल पराब म्हणाले की, देवेंद्र फडणवीस व अजित पवार याचा वाढदिवस होता. मात्र काही कारणास्तव दोघांनीही वाढदिवस साजरा केला नाही. मी संपूर्ण सभागृहाच्या वतीने त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो. दोघंही उपस्थित आहेत. आता आम्हा सर्वांना रिटर्न गिफ्ट म्हणून योग्य तो निधी द्यावा अशी अजब मागणी परब यांनी फडणवीस आणि अजित पवार यांच्याकडे केली आहे. दरम्यान अजित पवारांकडून देण्यात आलेल्या निधीवर शिंदे गटातील आमदारांकडूनही समाधान व्यक्त करण्यात आले आहे. आमदार भरत गोगावले यांनी याची कबुली दिली. युतीत काहीही मतभेद नसल्याचं गोगावले यांनी सांगितलं.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम