कोजागिरी आनंदात तर दिवाळीत होणार दुध दरवाढ

advt office
बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । १५ ऑक्टोबर २०२२ । नुकताच कोजागिरीचा सन उत्साहात पार पडला यावेळी दुधाचे भाव जरी स्थिर असले तरी ऐन दिवाळीच्या तोंडावर अमूल दूध दरात प्रती लिटर दोन रूपयांची वाढ होणार आहे. डाळ, तेल आणि महत्त्वाच्या वस्तूवरील वाढत्या भावाबरोबरच दुधाचेही भाव वाढल्यामुळे ग्राहकांच्या खिशाला कात्री लागणार आहे.

सध्या अमूलच्या एका लीटर दुधासाठी ६१ रूपये मोजावे लागत होते. त्यानंतर आता एका लिटर दुधासाठी ६३ रूपये मोजावे लागणार आहेत. तर आजपासून अमूलने ही दरवाढ लागू केली आहे. त्यामुळे ग्राहकांना दिवाळीच्या तोंडावर महागाईच्या झळा सहन कराव्या लागणार आहेत.
दरम्यान, डाळी, तेल आणि महत्त्वाच्या खाद्यपदार्थांच्या भावात नुकतीच वाढ झाल्यामुळे ग्राहकांना त्याचा फटका बसणार आहे. तर दिवाळी तोंडावर आली असून दुधाचेही भाव वाढल्यामुळे महागाईने ग्राहकांना झळा सहन कराव्या लागणार आहेत.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम