
मराठा समाजामध्ये फुट पाडण्याचा मंत्री पाटलांचा प्रयत्न – विनायक राऊत
दै. बातमीदार । १५ ऑक्टोबर २०२२ । सकल मराठा समाजामध्ये फूट पाडण्यासंदर्भात राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांची कथित व्हिडिओ व ऑडिओ क्लिप व्हायरल होत आहे. यावर सिंधुदुर्ग जिल्ह्यात बोलताना खासदार विनायक राऊत यांनी मराठा समाजामध्ये फक्त पक्ष स्वार्थ साधून चंद्रकांत पाटील यांनी फूट पाडण्याचा प्रयत्न केला असल्याचा गंभीर आरोप केला आहे.
मराठा आरक्षणासंदर्भातील कथित ऑडिओ क्लिपमध्ये चंद्रकांत पाटलांच्या नावाचा उल्लेख आहे. मराठा क्रांती मोर्चामध्ये फूट पाडल्याचा आरोप या क्लिपमध्ये करण्यात आला आहे. पैशांची देवाण-घेवाण झाल्याचा ऑडिओ क्लिपमध्ये उल्लेख झाल्याचे ऐकायला मिळत आहे. मात्र, स्पष्टपणे याबाबत बोलले गेले नाही. चंद्रकांत पाटलांनी सदर ऑडिओ क्लिपमध्ये करण्यात आलेले आरोप फेटाळले आहेत. मात्र हा बदनामी करण्याचा कट असल्याचे पाटील यांनी म्हटले आहे. दरम्यान, खासदार विनायक राऊत यांनी चंद्रकांत पाटील यांचे कृत्य निषेधार्ह असल्याचे म्हणत त्यांनी मराठा समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न केला असल्याचा आरोप केला आहे.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम