मध्यरात्री पाळधी परिसरात दोन रुग्णवाहिकांची तोडफोड !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । २० जुलै २०२३ ।  धरणगाव तालुक्यातील पाळधी ते दोनगाव रस्त्यावर एका बँकेच्या परिसरात दोन शिवसेनच्या रुग्णवाहिकेची अनोळखी इसमांनी मध्यरात्रीच्या सुमारास तोडफोड केल्याची संतापजनक घटना पहाटेच्या सुमारास उघडकीस आली आहे. ही माहिती परिसरात पसरली तशीच धरणगाव पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक उद्धव ढमाले हे घटनास्थळी दाखल झाले होते.

मिळालेल्या माहितीनुसार, धरणगाव तालुक्यातील पाळधी येथील दोनगाव रस्त्यावरील एका बँकेजवळ परिसरात शिवसेनेच्याही दोन रुग्णवाहिका नेहमी उभ्या असताना मध्यरात्रीच्या सुमारास अनोळखी इसमांनी या दोन गाड्याची तोडफोड केल्याची घटना आज पहाटे ग्रामीण भागातील एका रुग्णाला तातडीने जळगावला रुग्णालयात दाखल करावयाचे असल्याने चालक रुग्णवाहिका घेण्यासाठी गेला असता एका रुग्णवाहिकेची आतून तोडफोड झालेली दिसून आल्याने हि घटना उघडकीस आली आहे. तर दुसऱ्या एका रुग्णवाहिकेवर धर्मवीर आनंद दिघे यांच्यासह मुख्यमंत्री, पालकमंत्री यांचे फोटो असलेले स्टीकर देखील फाडण्यात आल्याची माहिती आहे. एवढेच नव्हे तर घटनास्थळी आगपेटी सापडल्यामुळे रुग्णवाहिका जाळण्याचाही प्रयत्न होता का?, अशी शंका उपस्थित केली जात होती. राजकीय द्वेषातून ही घटना घडल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम