मानाच्या लाकडी गणपती मंदिरात श्रींच्या मुर्तीची स्थापना सानंदांनी घेतले श्रींचे दर्षन

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । १ सप्टेंबर २०२२।  मानाच्या लाकडी गणपती मंदिरात श्रींच्या मुर्तीची स्थापना
सानंदांनी घेतले श्रींचे दर्षन.

दि.३१ ऑगस्ट २०२२ रोजी अय्याची कोठी स्थित पुरातन मानाच्या श्री लाकडी गणपती मंदिरात गणेष चतुर्थीनिमित्त सकाळी    ११:३० वा.च्या सुमारास विसर्जनाची मुर्ती आणून ब्रम्हवृंदांच्या हस्ते विधीवत पुजा-अर्चा करुन गणेष मुर्तीची स्थापना करण्यात आली.यावेळी मानाच्या लाकडी गणपती मंदिराचे संजय गिरजापुरे,अमित गोयनका,अजय अग्रवाल,अभिशेक अग्रवाल,संजय झुनझुनवाला,जगदेव गोडाळे,बावस्कर गुरुजी यांच्यासह मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व भाविक भक्त उपस्थित होतेे.

गणेष चतुर्थी निमित्त मा.आमदार राणा दिलीपकुमार सानंदा यांनी सुध्दा मानाच्या लाकडी गणपती मंदिरामध्ये जावुन विघ्नहर्ता गणरायाची पुजा-अर्चा करुन दर्षन घेतले. यावेळी त्यांच्यासमवेत माजी नगराध्यक्ष राणा अषोकसिंह सानंदा,माजी नगराध्यक्षा सौ.अलकादेवी सानंदा,सौ.विजयादेवी सानंदा,माजी नगरसेवक किषोरआप्पा भोसले हे उपस्थित होते.

यावेळी बोलतांना मा.आमदार राणा दिलीपकुमार सानंदा म्हणाले की,मानाचा लाकडी गणपती हा खामगावकरांचे आराध्य दैवत असुन नवसाला पावणारा देव म्हणून या गणपतीची सर्वत्र ख्याती आहे.लाकडी गणपतीषी अनेक भाविकांच्या धार्मिक भावना जुळलेल्या आहे. मंडळाचे अध्यक्ष अॅड.आर.बी.अग्रवाल व त्यांच्या सहकार्यांनी लाकडी गणपती मंदिराचा जिर्णोध्दार केला. मानाचा लाकडी गणपती हा रजत नगरीचे वैभव असुन या मंदिरामध्ये दर्षनासाठी येणाÚया भाविकांचा मनोकामना पुर्ण होत असतात.श्री गणराया म्हणजे ज्ञान आणि बुध्दीची देवता,मांगल्य देवता आणि बुध्दी देवतेचा उत्सव म्हणजेच गणेषोत्सव असुन या उत्सवाला ऐतीहासिक परंपरा आहे.गणेषोत्सवात सर्वत्र सुख,षांती आणि समृध्दी नांदावी,षहरात सदैव सलोखा कायम राहावा अषी प्रार्थना करुन गणेष मंडळांनी पर्यावरणपुरक व ध्वनीप्रदुशणमुक्त गणेषोत्सव साजरा करुन प्रषासनास सहकार्य करावे असे आवाहनही सानंदा यांनी यावेळी केले.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम