श्याम देश के नाम हा देशभक्तीपर गीतांचा कार्यक्रम संपन्न

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । १ सप्टेंबर २०२२। विद्यार्थी विकास विभाग कवयित्री बहिणाबाई चौधरी उ म विद्यापीठ जळगांव व म. ज. पो. व. कला, वाणिज्य व श्री वि. कृ. कुलकर्णी विज्ञान महाविद्यालय धडगांव यांच्या यांच्या संयुक्त विद्यमाने केंद्र शासनाच्या आजादी का अमृत महोत्सव या अभियाना अंतर्गत एक श्याम देश के नाम हा देशभक्तीपर गीतांचा कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमाचे उदघाटन धडगांव नगरपंचायतीचे नगराध्यक्ष धनसिंग पावरा यांच्या हस्ते संपन्न झाले.

या प्रसंगी माजी सैनिक प्रविण मनोहर कापडे,धडगांवफकिरा भुर्‍या पाडवी ,कुंडल यांचा विशेष सत्कार करण्यात आला.समाजासाठी विविध क्षेत्रात योगदान देणार्‍या मान्यवरांचाही सत्कार या प्रसंगी संस्थेचे सचिव तथा स्वागताध्यक्ष अरुण वळवी यांच्या हस्ते करण्यात आला.यात स्टेट बॅंकेचे शाखाव्यवस्थापक डाॅ भुषण अत्रे, पत्रकार राजु पावरा, सचिन जळोदकर, सागर निकवाडे, विठ्ठल कदम, भुषण मोरे यांचा समावेश होता.

या नंतर कार्यक्रमात देशभक्तीपर गीतांचे अप्रतिम सादरीकरण पंचम ऑर्केष्ट्राचे प्रा डाॅ राहुल मेघे, सुनीता डोंगरे व सिकंदर भाई यांनी केले. अनिल पाडवी या विद्यार्थ्याने देशभक्ती गीतावर अप्रतिम नृत्याविश्कार सादर केला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डाॅ एच एम पाटील यांनी व आभार प्रा यु जी वळवी यांनी मानले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डाॅ व्ही जी गोणेकर यांनी केले. प्रा अनिल शिंदे, प्रा.डाॅ.सुनील शिंदे प्रा डाॅ मनोहर पाटील, प्रा अशोक राठोड, हर्षद पाडवी, प्रा. कल्पना साळवे, खेमसिंग वळवी, रतिलाल पावरा यांनी संयोजन सहाय्य केले.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम