दोन दिवसांत थंडी पुन्हा परतणार
बातमीदार | १२ नोव्हेबर २०२३
देशभर दिवाळी सण उत्साहात सुरु असतांना काही राज्यासह अनेक जिल्ह्यात पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. पण सध्या दिवाळीच्या उत्तरार्धात कडाक्याची थंडी पडण्याची शक्यता आहे. पुढील दोन दिवसांत थंडी पुन्हा परतणार आहे. पुढील आठवडाभर तरी आकाश मुख्यतः निरभ्र राहून, सकाळी धुके पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. दिवाळी सणावर असलेले पावसाचे सावट दूर झाले आहे. नोव्हेंबरच्या उत्तरार्धात मात्र पावसाची शक्यता नसल्याचे हवामान तज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे. ढगाळ आकाशामुळे राज्याच्या तापमानात चढ-उतार सुरू आहे.
शहरासह संपूर्ण जिल्ह्यातच ढगाळ हवामान निवळले असून, पुढील दोन दिवसांत थंडी पुन्हा परतणार आहे. पुढील आठवडाभर तरी आकाश मुख्यतः निरभ्र राहून, सकाळी धुके पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. त्यामुळे दिवाळी सणावर असलेले पावसाचे सावट दूर झाले आहे.
राज्यात आज रविवारी ढगाळ हवामानासह तापमानात चढ-उतार होण्याची शक्यता आहे. राज्यात मुख्यतः कोरड्या हवामानाचा अंदाज आहे. राज्यात गारठा कमी झाला असून, गुलाबी थंडीची प्रतीक्षा आहे. पश्चिम-मध्य अरबी समुद्रात चक्राकार वाऱ्यांची स्थिती कायम आहे. बंगालच्या उपसागरात मंगळवारपर्यंत कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याचे संकेत आहेत. पश्चिमेकडे सरकताना या प्रणालीची तीव्रता वाढेल. ढगाळ आकाशामुळे राज्याच्या तापमानात चढ-उतार सुरू आहे.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम