कृषीमंत्र्यांच्या पुढाकाराने मिळाली १९ तरुणांना शासकीय नोकरी !

बातमी शेअर करा...

बातमीदार | १२ नोव्हेबर २०२३ |  राज्यातील  शिंदे फडणवीस व पवार यांच्या सरकारमधील कृषीमंत्री धनंजय मुंडे हे कृषी विभगतील अनेक महत्वपूर्ण निर्णय घेत असतांना त्यांनी नुकतेच कृषीसेवक पदाच्या प्रतीक्षा यादीत असलेल्या १९ तरुणांनी दोन-तीन वर्षे अभ्यास करून कृषीसेवक पदाची परीक्षा दिली. परंतु, कोविडच्या साथीमुळे परीक्षा, निकाल आणि नियुक्ती प्रक्रिया रखडली. यादरम्यान झालेल्या विलंबामुळे निवडसूची वैधता कालावधी संपल्याचे तांत्रिक निमित्त बनले आणि या मुलांचे भवितव्य अडचणीत आले कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी मात्र या तरुणांच्या भवितव्याचा विचार करून निर्णय घेतल्याने या १९ तरुणांच्या करिअरची वाट मोकळी झाली. त्यांना अखेर शासकीय सेवेत नियुक्ती मिळाली.

राज्य शासनाच्या कृषी विभागाने ३१३ कृषीसेवक पदांच्या भरतीसाठी प्रक्रिया सुरू केली. त्यासाठी राज्यातून सव्वा लाख अर्ज प्राप्त झाले होते. सन २०१९ मध्ये परीक्षा घेण्यात आली व २०२० मध्ये निकाल जाहीर करण्यात आला. निकालात उत्तीर्ण उमेदवारांनी काही कारणामुळे नियुक्ती स्वीकारली नाही किंवा विशिष्ट प्रवर्गातील उमेदवार उपलब्ध झाले नाहीत, तर प्रतीक्षा यादीतील उमेदवारांना संधी दिली जाते. अशा १९ उमेदवारांना कृषीसेवकपदी नियुक्तीची संधी मिळाली. त्याच दरम्यान कोविडची साथ आल्याने सर्व व्यवहार ठप्प झाले. सन २०२० ते २१ या कालावधीत कोविड साथीमुळे या कृषीसेवक भरती प्रक्रियेतील उमेदवारांना नियुक्ती देण्याचे काम सुद्धा रखडले.

निकालाच्या दिनांकापासून एक वर्षात नियुक्ती देणे बंधनकारक होते. मात्र कोविडमुळे नियुक्ती देण्याबाबतच्या प्रस्तावास उशीर झाल्याने निवड सूची वैधता कालावधी संपुष्टात आला. त्यामुळे या १९ तरुणांनी महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणात दाद मागितली. त्यावर न्यायाधिकरणाने संबंधित उमेदवारांना गुणवत्तेनुसार नियुक्ती देण्यासंदर्भात शासनाने निर्णय घ्यावा, असे आदेश २०२१ च्या अखेरीला दिले. त्यानुसार या १९ तरुणांनी नियुक्तीच्या निर्णयासाठी शासनाचे दार ठोठावले. मुंडे यांनी १५ जुलै २०२३ रोजी कृषी मंत्रीपदाचा पदभार स्वीकारला. त्यानंतर ताबडतोब या मुलांना न्याय देण्याची प्रक्रिया सुरू केली. अखेर या तरुणांना कृषीसेवक पदावर नियुक्ती देण्यात आली.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम