वडधे(जुने) येथील प्रवेशद्वाराच्या लोकार्पण सोहळा आमदार किशोर पाटील यांच्या हस्ते लोकांर्पण

बातमी शेअर करा...

भडगाव/प्रतिनिधी

स्व.बापुजी युवा फाऊंडेशन तर्फे वडधे(जुने) येथील प्रवेशद्वाराच्या लोकार्पण सोहळा आमदार किशोर पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.

याप्रसंगी उद्घाटक आमदार तसेच गावातील ज्येष्ठ मान्यवर यांचा स्व.बापुजी युवा फाऊंडेशनचे संचालक लखीचंदभाऊ पाटील यांनी शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. नंतर आमदार किशोर पाटील यांनी मनोगत व्यक्त करतांना प्रवेशद्वाराचे व स्व.बापुजी युवा फाऊंडेशन तर्फे नेहमी होत असणारी सामाजिक सेवा, विविध कार्यक्रमाचे कौतुक केले. त्यानंतर फाऊंडेशन तर्फे सर्वांना अल्पोपहार देण्यात आला. यावेळी स्व.बापुजी युवा फाऊंडेशनचे सर्व संचालक, सदस्य, वडधे (जुने-नवे) गावातील सर्व ज्येष्ठ ग्रामस्थ मंडळी, युवा मित्र परिवार उपस्थित होते

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम