संक्रातीच्या शुभेच्छा देत सरकारला धरले धारेवर !
दै. बातमीदार । १५ जानेवारी २०२३ । राज्यातील शिंदे व ठाकरे गटाचे नियमित वाद सुरु असतांना आज होणाऱ्या मकर संक्रातीनिमित ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी आपल्या ट्वीटद्वारे खास शुभेच्छा दिल्या. मात्र या शुभेच्छा देताना आदित्य ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांना धारेवर धरले आहे.
आदित्य ठाकरे म्हणाले, “तिळगुळ घ्या आणि महाराष्ट्रहिताचं बोला!, महाराष्ट्रात सुरु असलेल्या द्वेषाच्या राजकारणामुळे सर्रास बेताल विधानं होत आहेत. महापुरुषांचे अपमान होत आहेत. स्त्रियांचा अपमान होत आहे. सामाजिक वातावरण गढूळ होत आहे आणि या साऱ्यात जनतेचे प्रचंड नुकसान होत आहे. द्वेष आणि खोटेपणा सोडा, स्वच्छ राजकारणाने मनं जोडा.”
तिळगुळ घ्या आणि महाराष्ट्रहिताचं बोला! pic.twitter.com/QkgKgVGWZb
— Aaditya Thackeray (@AUThackeray) January 15, 2023
मागील सहा महिन्यांत राज्यात नवे वाद-विवाद निर्माण झाले, गद्दारीची भावना निर्माण झाली, राज्यातील उद्योग दुसऱ्या राज्यात पळविले. हे सर्व राज्यात घडत असताना शिवसेनेत नवे चेहरे निर्माण होत आहेत. निष्ठावंत शिवसैनिक पुढे येत आहेत. सुकलेली पाने गळून गेली आहेत. त्यामुळे राज्यातील अल्पआयुचे आणि खोके सरकार दोन ते तीन महिन्यात कोसळणारच अशी टीका आमदार आदित्य ठाकरे यांनी केली होती. ४० जणांनी व्ही.आर.एस. घेतला असून त्यांचे चेहरे पुन्हा महाराष्ट्रात दिसणार नाही, असेही आदित्य ठाकरे म्हणाले होते.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम