
दै. बातमीदार । ०९ जुलै २०२२ । जळगाव येथील रोटरी क्लब जळगाव वेस्टचा पदग्रहण सोहळा थाटात संपन्न झाला. नूतन अध्यक्ष सुनील सुखवाणी, मानद सचिव विवेक काबरा त्यांच्या पदांवर विराजमान झाले.
मायादेवी नगरातील रोटरी भवनमध्ये शनिवार दि.९ जुलै रोजी सायंकाळी ७ वाजता रोटरी डिस्ट्रिक्ट ३१४१ चे माजी प्रांतपाल डॉ. बाळकृष्ण इनामदार यांच्या प्रमुख उपस्थितीत सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. सहप्रांतपाल डॉ. मुर्तुझा अमरेलीवाला यांची विशेष उपस्थिती होती.
सुनील सुखवाणी यांना कृष्णकुमार वाणी यांनी अध्यक्षपदाचा तर विवेक काबरा यांना अनुप असावा यांनी मानद सचिव पदाचा पदभार कॉलर, पीन, चार्टर्ड देऊन सूपूर्द केला. अनुप असावा यांनी सचिवांचा अहवाल तर कृष्णकुमार वाणी यांनी २०२१-२२मध्ये केलेल्या कार्याची माहिती दिली. अध्यक्ष सुनील सुखवाणी यांनी आगामी वर्षातील कार्यक्रमांचे नियोजन सांगून कार्यकारिणीची घोषणा केली.
नूतन कार्यकारिणीत आयपीपी कृष्णकुमार वाणी, उपाध्यक्ष केकल पटेल, प्रेसिडेंट इलेक्ट सरिता खाचणे, कोषाध्यक्ष देवेश कोठारी, सह कोषाध्यक्ष अमित चांदीवाल, सार्जंट अँट आर्म शंतनू अग्रवाल, सहसचिव गौरव सफळे, तर कार्यकारिणी सदस्य व कमेटी चेअरमन म्हणून डॉ. राजेश पाटील, नितीन रेदासनी, अनंत भोळे, विनित जोशी, डॉ. सुशीलकुमार राणे, योगेश राका, तुषार चित्ते, प्रविण जाधव आणि ट्रेनर म्हणून गनी मेमन, संदीप काबरा यांचा समावेश आहे. संचालक म्हणून अरुण नंदर्षी, रमण जाजू व योगेश भोळे यांचा तर विशेष निमंत्रित संचालक म्हणून विनोद बियाणी, अनिल कांकरिया, सुनील अग्रवाल, किरण राणे, ॲड. सुरज जहाँगीर, संजय इंगळे, चंद्रकांत सतरा, महेश सोनी, सचिन वर्मा, संगीता पाटील, मुनीरा तरवारी यांचा समावेश आहे.
माजी प्रांतपाल बाळकृष्ण इनामदार यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. सहप्रांतपाल डॉ. अमरेलीवाला यांनी प्रांतपालांचा संदेश वाचून दाखविली. विनीत जोशी संपादित क्लबच्या “संवाद” बुलेटीनचे प्रकाशन करण्यात आले. परिचय डॉ. सुशीलकुमार राणे यांनी तर आभार सरिता खाचणे यांनी मानले. शिल्पा सफळे यांनी गणेश वंदना सादर केली. ॲड. सूरज जहाँगीर यांनी सूत्र संचालन केले. कार्यक्रमास रोटरीचे डिस्ट्रिक्ट ऑफिसर्स, सर्व क्लबचे नूतन अध्यक्ष व मानद सचिवांसह विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम