
घरंदाज सूर या दृकश्राव्य अविष्काराने रसिक तल्लिन
दै. बातमीदार । ०९ जुलै २०२२ । स्वर्गीय वसंतराव चांदोरकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त स्व. वसंतराव चांदोरकर स्मृति प्रतिष्ठान व भवरलाल अँड कांताबाई जैन फाउंडेशनतर्फे घरंदाज सूर या दृकश्राव्य अविष्काराचे आयोजन करण्यात आले.
कांताई सभागृहामध्ये अनोख्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक दीपिका चांदोरकर यांनी केले. गुरुवंदना अथर्व मुंडले यांनी सादर केली.
भारतरत्न लतादीदींनी ना प्रतिष्ठानच्या वतीने श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
लतादीदींनी गायलेल्या अभिजात संगीतावर आधारित रचनांचा “घरंदाज सूर” हा दृकश्राव्य अविष्काराचे दीपप्रज्वलनाने सुरवात झाली. याप्रसंगी सौ. प्रभा जोशी, डॉ. मृणाल चांदोरकर, उपजिल्हाधिकारी सौ. शुभांगी भारदे, प्रतिष्ठानच्या उपाध्यक्षा सौ दीपिका चांदोरकर यांनी केले.पुणे आकाशवाणी वर कार्यक्रम अधिकारी म्हणून सेवाव्रत असलेल्या प्रभा जोशी यांनी बहारदार सादरीकरण करून रसिकांचे मने जिंकली. प्रभा जोशी यांना डॉक्टर मृणाल चांदोरकर यांनी सहकार्य केले. विख्यात गायिका लता मंगेशकर यांचा सूर म्हणजे साक्षात सरस्वतीचं मूर्त रुप. या लता मंगेशकर यांचे स्वरांद्वारे स्मरण करण्यात आले. भारतीय चित्रपट संगीत क्षेत्राची ही जणु अनभिषिक्त सम्राज्ञी. मा. दीनानाथ मंगेशकर यांच्या सारख्या महान गवैया कडून संगीताचा वारसा वंश परंपरेनी मिळाला तरी लता मंगेशकर यांची दैदिप्यमान कामगिरी घडली ती चित्रपट संगीत क्षेत्रात. भारतीय शास्त्रीय संगीताच्या महान परंपरेत ज्या दिग्गज गायिका होऊन गेल्या त्यात दीदींचं नाव आलं नाही. परंतु या दिव्य सूरांनी चित्रपट संगीतातूनही घरंदाज शास्त्रीय संगीताचे सगळे आदर्श दाखवत आपली वंश परंपरा आणि गायकी सिद्ध केली. त्यांची ही वैशिष्ट्यपूर्ण गायकी सोदाहरण उलगडून दाखवणारा कार्यक्रम ‘ घरंदाज सूर ‘ रसिक श्रोते यांना आनंद देऊन गेला.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम