कोरोना रुग्णात वाढ ; या राज्यात मास्क सक्ती !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । १० एप्रिल २०२३ ।  देशभरात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्यानं वाढत असल्याचं चित्र सर्वत्र दिसत आहे. नियमित नवीन कोरोना सक्रिय रूग्ण संख्येने देखील वाढ होत आहे. दरम्यान, देशातील काही राज्यांमध्ये मास्क सक्ती करण्यात आली आहे.

दिल्लीतील सर्व रुग्णालये आणि दवाखान्यांमध्ये चाचणी वाढवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. दरम्यान, कोरोना संसर्गामुळे उद्भवणाऱ्या कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्यासाठी सज्जतेचा आढावा घेण्यासाठी सोमवार आणि मंगळवारी देशभरात मॉकड्रिल घेण्याची तयारी सुरू आहे.

वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर हरियाणा सरकारने खबरदारीचा उपाय म्हणून सार्वजनिक ठिकाणी आणि शाळांमध्ये मास्क घालणे अनिवार्य केले आहे. जिल्हा प्रशासन आणि पंचायतींनाही कोरोना प्रोटोकॉल पाळले जातील याची काळजी घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. केरळ सरकारने गरोदर महिला, ज्येष्ठ नागरिक आणि इतर गंभीर आजारांनी ग्रस्त लोकांसाठी मास्क अनिवार्य केले आहेत. पुद्दुचेरी प्रशासनाने तत्काळ प्रभावाने सार्वजनिक ठिकाणी मास्क अनिवार्य केले आहेत.

तसेच, उत्तर प्रदेश सरकारने राज्यातील सर्व विमानतळांवर परदेशातून येणाऱ्या प्रवाशांचे स्क्रीनिंग सुनिश्चित करण्याचे निर्देश दिले आहेत. रविवारी गेल्या 24 तासांत देशात 5,357 नवीन रुग्ण आढळले आहेत. रुग्णांची संख्या 32,814 वर पोहोचली आहे. शनिवारी 6,155 नवीन प्रकरणांची नोंद झाली. गेल्या 24 तासांत केरळमध्ये 1801 नवीन रुग्ण आढळले आहेत. एर्नाकुलम, तिरुअनंतपुरम आणि कोट्टायम जिल्ह्यात वेगाने रुग्ण आढळत आहेत.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम