कारागृह प्रशासनाला झटका : तुरुंगात एका महिलेसह ४४ पेक्षा जास्त कैदी एचआयव्ही पॉझिटिव्ह !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । १० एप्रिल २०२३ ।  देशात नेहमीच आपल्याकडे असलेल्या तुरुंगातील सुरक्षितते बाबतच्या अनेक बातम्या व्हायरल होत असतात पण त्या बातम्या देखील खऱ्या असतात. अशीच एक बातमी सध्या प्रंचड धुमाकूळ घालत आहे. या बातमीमुळे कारागृह प्रशासनाला मोठा झटकाच बसला आहे.

मिळालेली माहिती अशी कि, उत्तराखंडमधील हल्दवानी तुरुंगात एका महिलेसह ४४ हून अधिक कैदी एचआयव्ही पॉझिटिव्ह आढळले आहेत. एवढ्या मोठ्या संख्येने कैदी एचआयव्ही बाधित झाल्याने कारागृह प्रशासनाला धक्का बसला आहे. या पॉझिटिव्ह रुग्णांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. कारागृह प्रशासन याबाबत बोलायलाही तयार नाही. एवढ्या मोठ्या संख्येने कैदी कसे पॉझिटिव्ह झाले, हे अजून पर्यंत कळू शकले नाही.

कैद्यांवर उपचार सुरू असलेल्या रुग्णालयातील डॉक्टरांनी सांगितले की, महिन्यातून दोनदा रुग्णालयातील एक पथक नियमित तपासणीसाठी कारागृहात येते. ज्या कैद्यांना किरकोळ समस्या आहेत त्यांना जागेवरच औषध दिले जाते. अधिक गंभीर समस्या असलेल्या लोकांवर रुग्णालयात उपचार केले जातात. एचआयव्हीबाधित कैद्यांवर वेळेवर उपचार व्हावेत यासाठी कारागृह प्रशासन नियमित तपासणीही करत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. तर एचआयव्ही रुग्णांसाठी अँटीरेट्रोव्हायरल थेरपी केंद्र सुरू करण्यात आले आहे. इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, डॉक्टर नियमितपणे कैद्यांची तपासणी करतात. एखादा कैदी एचआयव्ही पॉझिटिव्ह आढळल्यास त्याच्यावर मोफत उपचार केले जातात. डॉक्टरांच्या मते, एचआयव्हीची अनेक कारणांमुळे लागण होवू शकते. या प्रकारा बाबत जेल अधिकाऱ्यांकडून कोणताही प्रतिक्रिया आली नाही. हा प्रकार समोर आल्यानंतर तुरुंग प्रशासन हादरले आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम