शिंदे गटातील आमदाराच्या अडचणीत वाढ ; तलवार काढणे भोवले !

बातमी शेअर करा...

बातमीदार | २९ ऑगस्ट २०२३

राज्यातील शिंदे गटातील आ.संतोष बांगर हे नेहमी चर्चेत असलेले आमदार असून पुन्हा एकदा ते चर्चेत आले आहे. आ.बांगर यांची एखादी कृती किंवा वक्तव्यावरुन वाद निर्माण होत असतो. संतोष बांगर आता पुन्हा एकदा अडचणीत आले आहेत. रविवारी हिंगोलीत उद्धव ठाकरे यांची सभा झाली. या सभेत बोलताना उद्धव ठाकरे यांनी नाव न घेता संतोष बांगर यांच्यावर जोरदार टीका केली. या सभेनंतरच दुसऱ्यादिवशी म्हणजे सोमवारी संतोष बांगर यांनी कावड यात्रा काढली होती.

या कावड यात्रेच्या माध्यमातून संतोष बांगर यांनी शक्ती प्रदर्शन केलं. यावेळी उपस्थित जनसमुदायासमोर त्यांनी एक कृती केली, त्यामुळे ते अडचणीत आले आहेत. संतोष बांगर यांनी उपस्थित जनसमुदायासमोर तलवार काढून दाखवली. डीजेला परवानगी नसताना, डीजे लावला. या प्रकरणी कळमनुरी पोलीसात गुन्हे दाखल झाले आहेत. काल हजारों शिवभक्तांच्या उपस्थितीत आमदार संतोष बांगर यांनी कावड यात्रा काढली होती. रविवारी उद्धव ठाकरे यांची हिंगोलीत सभा झाली. त्यावेळी ते म्हणाले की, “हिंगोली नेहमीच शिवसेनाप्रमुखांच्या हिंदुत्ववादी विचाराच्या मागे उभी राहिलीय. गद्दार बेंडकुळ्या दाखवत आहे. त्यात फक्त हवा आहे, ताकत माझ्याकडे आहे” “आपल्याच माणसावर, उद्धटपणा करणार असेल, तर याचा उद्धटपणा चिरडून गाडून टाकावा लागेल” असं उद्धव ठाकरे म्हणाले.

त्यावर संतोष बांगर यांनी प्रत्युत्तर दिलं. “बेंडकुळ्या आहेत, तेच दाखवतील. खऱ्या बेंडकुळ्या कुठे असतील, तर मायबाप जनता आहे” असं संतोष बांगर म्हणाले. “शिंदे गटाने माझा बाप चोरला. ही बाप चोरणारी टोळी आहे” अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली होती. त्याला उत्तर देताना बांगर म्हणाले की, “बाळासाहेब ठाकरे हे आमच्या सर्वांचे आहेत. त्यामुळे आमचा बाप चोरला असं कुणीही म्हणू नये”

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम