‘या’ अभिनेत्रीने असा साजरा केली रक्षाबंधन !

बातमी शेअर करा...

बातमीदार | २९ ऑगस्ट २०२३ | दोन दिवसावर येवून ठेपलेल्या रक्षाबंधन सणानिमित्त बाजारपेठेत मोठी गर्दी झाली आहे. या सणाला बहीण भाऊ एकमेकांना राखी बांधतात व छानशी भेटवस्तू घेतात. प्रत्येकजण हा सण साजरा करतो. मग त्याला कलाकारही अपवाद कसे राहतील. हा सण कलाकारमंडळीही अनोख्या पद्धतीने साजरा करत असतात. कुणी एखादी पोस्ट लिहितो, कुणी फोटो शेयर करतो तर कुणी त्यांच्या घरगुती सोहळ्याचे फोटो चाहत्यांसोबत शेयर करत असतात.

झी मराठीवरील नवीन मालिका ‘सारं काही तिच्यासाठी’ मालिकेतील अभिनेत्री खुशबू तावडे हीने आपल्या खास आठवणी शेयर केल्यात, ” रक्षाबंधनाचा दिवस आमच्यासाठी जिव्हाळ्याचा राहिला आहे कारण घरात नेहमीच खेळीमेळीचं वातावरण राहिल आहे. दरवर्षी सकाळी पहिली राखी देवाला , दुसरी राखी आमच्या बाबांना आणि तिसरी राखी मी आणि तितिक्षा एकमेकींना बांधायचो. लहानपणी जेव्हा कळतं वय नव्हतं तेव्हा फक्त भेटवस्तूंसाठी राखी बांधायचो ,पण जेव्हा मोठे झालो तेव्हा कळायला लागलं तेव्हापासून बहिणीचं हे बंधन आणि नातं जोपासण्यासाठी आम्ही हा सण साजरा करायचं ठरवले.

ह्यावर्षीचं रक्षाबंधन आमच्यासाठी खास आहे कारण आम्ही दोघी बहिणी झी मराठीवरील दोन मालिकांमध्ये मुख्य भूमिकेत काम करत आहोत व ही आमच्यासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे. माझी नवीन मालिका जी दोन बहिणींवर आधारित आहे व ह्याच मालिकेच्या प्रोमोशन निम्मिताने आम्ही दोघीनी पूर्ण महिना साजरा केला आहे. एकमेकींना भेट वस्तू पण दिल्या आहेत. ह्या वर्षी कितीही कामात व्यस्त असलो तरीही एकमेकींसाठी नक्की वेळ काढून भेटणार आहोत व हा दिवस साजरा करणार आहोत. प्रत्येक बहिणींनी आपली नाती जपावी हा संदेश तर आम्ही आमच्या मालिकेतून देतच आहोत. रक्षाबंधनाच्या निमित्ताने सगळ्यांना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. ”

‘सारं काही तिच्यासाठी’ या नवीन मालिकेत खुशबू मुख्य भूमिका साकारताना दिसत आहे. या नवीन मालिकेत तिच्यासोबत अभिनेते अशोक शिंदे आणि अभिनेत्री शर्मिष्ठा राऊत हे दोन प्रसिद्ध कलाकारसुद्धा मुख्य भूमिकेत दिसत आहेत. या मालिकेची कथा ही दोन बहिणींच्या अतूट नात्यावर आधारलेली आहे. या दोन सख्ख्या बहिणी काही कारणांमुळे 20 वर्ष एकमेकांपासून दुरावल्या जातात आणि मग नियती त्यांना परत कशी एकमेकांसमोर आणते यावर मालिकेचं कथानक आधारलेलं आहे. या दोन बहिणींची पात्रं खुशबू आणि शर्मिष्ठा साकारत आहेत. या दोन बहिणींमधील एक बहीण म्हणजे खुशबू ही गावात राहणारी साधीभोळी गृहिणी आहे तर दुसरी शर्मिष्ठा ही परदेशात राहणारी मॉडर्न वर्किंग वुमन आहे. अशोक शिंदे हे मालिकेत खुशबूचे पती दाखवले गेलेत.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम