धोंड्यांच्या महिन्यात सोन्यासह चांदीच्या दरात वाढ !

बातमी शेअर करा...

गेल्या काही महिन्यापासून सोन्यासह चांदीच्या दरात मोठी चढ उतार होत असतांना दिसत होती. पण गेल्या दोन ते तीन दिवसापासून याच भावात मोठी वाढ झालेली आहे. दिवाळी आणि दसऱ्याची तयारी सराफा व्यापाऱ्यांनी सुरु केली आहे. त्यामुळे देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने – चांदीची मागणी वाढली आहे.

एप्रिलपासूनच सोन्याच्या दरात वाढ होण्यास सुरुवात झाली आहे. काही आठवड्यात ६० हजारांच्या पार सोने गेले होते. मात्र, ता. १४ जूनपासून दरात घसरण होऊन ते ६० हजारांच्या खाली आले होते. आता पुन्हा भाववाढ होऊ लागली आहे. गुरुवारी  सोने ६० हजार शंभर रुपये प्रती तोळ्यावर पोहोचले आहे. मंगळवारी ५९ हजार सातशे रुपये प्रती तोळ्यावर होते. तीन वर्षांतून एकदा येणाऱ्या अधिक महिन्याला धोंड्यांचा महिना असे संबोधले जाते. जावयांचा खास मान या महिन्यात राखला जातो. धोंडफळ म्हणून जावयाला सोन्याचा दागिना देण्याची प्रथा आहे. अधिक मास संपल्यानंतर उत्सवांना प्रारंभ होतो. त्यातील दसरा, दिवाळी सर्वात मोठे सण. या दोन्ही सणांमध्ये सोन्याची खरेदी मोठ्या प्रमाणात होते. या सर्वांचा परिणाम म्हणजे वाढती मागणी पाहता सोन्याच्या दरात आणखी वाढ होण्याचे संकेत सोन्याचे व्यापारी व्यक्त करत आहेत.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम