ते भारताने करून दाखवलं ; उद्धव ठाकरेंनी केले कौतुक !

बातमी शेअर करा...

बातमीदार | २४ ऑगस्ट २०२३ | गेल्या १४ दिवसापूर्वी देशातून चांद्रयान-३ अंतराळात सोडण्यात आले होते. त्यांचे नुकतेच दि.२३ रोजी यशस्वी झाल्याने अवघ्या देशभरात जल्लोष साजरा करण्यात आला आहे. इस्त्रोच्या वैज्ञानिकांच्या कष्टाचे काल चिज झाले. त्यांच्या परिश्रम आणि अथक प्रयत्नांमुळे देशाने मोठं यश मिळवलं आहे. भारताच्या चांद्रयान-३ विक्रम लँडर यशस्वीरित्या चंद्रावर काल उतरले. त्यानंतर अख्या देश आनंदात न्हाऊन निघाला. देशात उत्साह पाहायला मिळाला. लोक इस्त्रोच्या वैज्ञानिकांचे अभिनंदन करताना दिसले. तर सर्वच राजकीय पक्षांनी इस्त्रोच्या वैज्ञानिकांनी शुभेच्छा दिल्या.

यावेळी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे पक्षप्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील इस्त्रोच्या वैज्ञानिकांचे अभिनंदन केले. यावेळी त्यांनी आपली प्रतिक्रिया देताना, भारताचे चंद्रयान सुरक्षित रित्या चंद्रावर उतरले. जे कोणाला साध्य झाले नाही ते भारताने करून दाखवलं. सर्व भारतीयांसाठी अभिमानाचा क्षण आहे. सर्व वैज्ञानिकांचे आणि नागरिकांचे हार्दिक अभिनंदन! अशा शब्दात त्यांनी आपल्या भावना बोलून दाखवल्या. त्याचबोरबर ‘हिंदुस्थानाने आज चंद्रावर पाऊल ठेवून इतिहास घडवला आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात अथक परिश्रम आणि संशोधन करणाऱ्या शास्त्रज्ञांचे हे यश असून त्यांनी हा इतिहास घडवला. त्याबद्दल त्यांचे अभिनंदन करावे तितके कमीच, असेही ठाकरे म्हणाले.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम