ऑलिम्पिकसाठी भारत इच्छुक ; पंतप्रधान मोदी

बातमी शेअर करा...

बातमीदार | १५ ऑक्टोबर २०२३

२०३६ मध्ये होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेचे आयोजन करण्यास भारत इच्छुक असून, तत्पूर्वी २०२९ मधील युवा ऑलिम्पिकच्या आयोजनासाठीही प्रयत्न केले जाणार आहे. या प्रयत्नांमध्ये भारताला आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीकडून सहयोगाची भूमिका कायम राहील, अशी आशा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी येथे व्यक्त केली.

मुंबईत आयोजित आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या अधिवेशनाचे शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन झाले. या वेळी समितीचे अध्यक्ष थॉमस बाक यांच्यासोबत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आदी उपस्थित होते.

पंतप्रधान म्हणाले की, भारताने यापूर्वीही जागतिक स्पर्धा यशस्वीपणे आयोजित केल्या आहेत. यंदा भारतात झालेली जी-२० परिषद ही आंतरराष्ट्रीय कार्यक्रम आयोजनातील भारताच्या सिद्धतेचे उत्कृष्ट द्योतक ठरले आहे. साहजिकच ऑलिम्पिक स्पर्धांच्या आयोजनासाठी आता भारत सज्ज झाला आहे. खेळाद्वारे विजेते आणि विद्यार्थी तयार होतात. क्रीडा स्पर्धा या फक्त स्पर्धा नसतात, तर त्या मानवता प्रसाराची माध्यमं असतात. तेथे फक्त विजेतेच तयार होत नाही, तर त्यातून शांती, प्रगती आणि स्वास्थ्याचे वातावरण तयार होते.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम