दोन महिन्यात निर्णय घ्या असा आदेश नाही ; राहुल नार्वेकर

बातमी शेअर करा...

बातमीदार | १५ ऑक्टोबर २०२३

राज्यातील शिवसेनेतील १६ आमदारांच्या अपात्र प्रकरणी न्यायालायने विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना फटकारल्यानंतर विरोधकांनी भाजपसह राहुल नार्वेकर यांच्यावर टीकास्त्र सोडल्यानंतर नार्वेकर यांनी आता यावर प्रतिक्रिया दिली आहे.

न्यायालयाने नोटीस जारी करण्याचा मुद्दा दिला आहे. त्यामध्ये दोन महिन्यांत निकाल द्या किंवा इतक्या दिवसात वेळापत्रक द्या असे कुठेही म्हटलेले नाही, असे सांगतानाच नार्वेकर पुढे म्हणाले, निकाल कधी दिला पाहिजे याबाबत कोण काय म्हणते याकडे मी लक्ष देत नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशात जे लिहिले आहे त्याची मी दखल घेतो. त्याअनुषंगाने कार्यवाही करण्याविषयी कायदेशीर सल्ला घेत आहे. परंतु आज माझ्याकडे आदेशाची प्रत आहे, ती ऑनलाइनही उपलब्ध आहे. ती वाचून पाहा. त्या आदेशात वर्तमानपत्रांमध्ये केलेल्या टीकेचा न्यायालयाने आपल्या आदेशात कुठेही उल्लेख केलेला नाही.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम