‘इंडिया’ची आज दिल्लीत बैठक ; ‘या’ विषयावर होणार चर्चा !
बातमीदार | १३ सप्टेंबर २०२३ | देशातील सत्ताधारी पक्षाला हरविण्यासाठी विरोधकांच्या इंडिया आघाडीच्या समन्वय समितीची बैठक आज दिल्लीत होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांच्या निवासस्थानी होणाऱ्या या बैठकीला १३ पक्षांचे नेते उपस्थित राहणार आहेत.
दरम्यान, या बैठकीत लोकसभेसाठी जागावाटपावर खलबतं होणार असल्याची चर्चा होती. मात्र अशी चर्चा होणार नसून विशेष अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर रणनीतीबाबत चर्चा होईल अशी माहिती समोर येत आहे. जागा वाटपाचा निर्णय हा राज्य पातळीवरच घेतला जाणार आहे. याशिवाय गणेश चतुर्थीनंतर इंडिया आघाडी देशभरात सभा घेणार आहे.इंडियाच्या बैठकीत निवडणूक आयोगाने अलिकडे दिलेल्या निर्णयावर चर्चा होणार आहे.
काही विषयावर काही पक्षात मतभेद आहेत ते दूर करण्याचा प्रयत्न या बैठकीत होणार आहे. महाराष्ट्रात गणपतीनंतर मोठ्या सभा घेण्याचे नियोजन करण्यात येणार आहे. याशिवाय जातनिहाय जनगणना, चीन प्रश्नावर मांडायची भूमिका, राज्य आणि केंद्र समन्वय व्हावा, मणिपूर संदर्भात चर्चा केली जाणार आहे. नेते फक्त पद मिळवण्यासाठी सिरियस, मुख्यमंत्र्यांच्या त्या व्हिडीओवर रोहित पवारांची टीकाशिवसेना पक्षाच्या संदर्भात निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णयासंदर्भात आज चर्चा होणार आहे. अलिकडे निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णया संदर्भात आजच्या बैठकीत चर्चा होईल, त्याचबरोबर निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धती बाबत जे आक्षेप विरोधी पक्षांना आहेत त्याबाबत चर्चा करून या संदर्भात निवडणूक आयोगाकडे एकत्रित भूमिका मांडली जाऊ शकते.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम