वर्ल्ड कप सामन्यामध्ये भारताची अवस्था खराब !

बातमी शेअर करा...

बातमीदार | १९ नोव्हेबर २०२३

गेल्या अनेक वर्षापासून आतुरतेने वाट पाहणाऱ्या भारतीयासाठी आजचा दिवस खूप महत्वाचा आहे. भारतीय क्रिकेट चाहत्यांना याची उत्सुकता होती. वर्ल्ड कप 2023 चा अंतिम सामना आज अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला जात आहे. अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताविरुद्ध नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

दोन वेळचा चॅम्पियन भारताचा सामना पाच वेळा चॅम्पियन ऑस्ट्रेलियाशी होणार आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने चमकदार कामगिरी केली आणि सर्व 10 सामने जिंकून फायनलमध्ये थाटात एन्ट्री मारली. तर ऑस्ट्रेलिया पहिले 2 सामने गमावल्यानंतर सलग 8 सामने जिंकून अंतिम फेरीत आले.

टीम इंडियाला 2011 नंतर पहिल्यांदाच विजेतेपद मिळवण्याची संधी आहे. जगातील सर्वात मोठ्या क्रिकेट स्टेडियममध्ये जगातील सर्वात यशस्वी क्रिकेट संघाविरुद्ध हा पराक्रम करण्याची संधी आहे. यासोबतच 2003 च्या फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या पराभवाचा बदला घेण्याचीही ही उत्तम संधी आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम