देशात महागाई वाढली ; खाद्यपदार्थांच्या किमतीत मोठी वाढ !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । १३ जुलै २०२३ ।  देशात गेल्या काही वर्षापासून मोठ्या प्रमाणात महागाई वाढत असतांना पुन्हा एकदा सामान्यांची चिंता पुन्हा वाढली आहे. जून 2023 मध्ये खाद्यपदार्थांच्या किमतीत झालेल्या दरवाढीमुळे किरकोळ महागाई दरात पुन्हा वाढ झाली आहे. जून महिन्यात किरकोळ महागाईचा दर 4.81 टक्के होता. तर मे 2023 मध्ये किरकोळ महागाईचा दर 4.31 टक्के इतका नोंदवण्यात आला.

सांख्यिकी मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार खाद्यपदार्थांच्या महागाई दरात मोठी वाढ झाली आहे. जूनमध्ये अन्नधान्य महागाईचा दर 4.49 टक्के झाला आहे. मे 2023 मध्ये 2.96 टक्के इतका होता. जून 2022 मध्ये अन्नधान्य महागाईचा दर 7.75 टक्के होता.

तूर डाळ आणि इतर डाळींच्या किंमतीत वाढ झाल्याने जून महिन्यात महागाई वाढली असल्याचे समोर आले आहे. जूनमध्ये डाळींची महागाई 10.53 टक्के होती. तर मे महिन्यात ती 6.56 टक्के नोंदवण्यात आली. पालेभाज्या आणि भाज्यांचा महागाई दर जूनमध्ये -0.93 टक्के होता, तर मे महिन्यात तो -8.18 टक्के होता. मसाल्यांच्या महागाईचा दर मागील महिन्यातील 17.90 टक्क्यांवरून 19.19 टक्क्यांवर पोहोचला आहे. दूध आणि त्याच्याशी संबंधित उत्पादनांच्या किमती मे महिन्यात 8.91 टक्क्यांच्या तुलनेत 8.56 टक्क्यांवर आला आहे. अन्नधान्य आणि संबंधित उत्पादनांचा महागाई दर 12.71 टक्के राहिला आहे. मे महिन्यात हा महागाई दर 12.65 टक्के होता. तेल आणि फॅट्सचा महागाई दर -18.12 टक्क्यांवर आला. मे महिन्यात हा महागाई दर -16.01 टक्के होता. साखरेचा महागाई दर 3 टक्के नोंदवण्यात आला असून गेल्या महिन्यात 2.51 टक्के होता.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम