शिंदे गटातील ‘त्या’ लोकांची हि चौकशी करा ; दानवे !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । २१ जून २०२३ ।  ठाकरे गटाचे निकटवर्तीय असलेले काही लोकांवर आज ईडीची मोठी कारवाई झाल्याच्या बातम्या आल्यानंतर ठाकर गटाचे विरोधीपक्षनेते अंबादास दानवे यांनी थेट शिंदे गटासह भाजपवर आरोप केले आहेत.

मुंबईत घोटाळा झाले ईडीला वाटते तर ठाण्यात काय झाले, पुणे, नागपूरात काय झाले. ईडी केवळ शिवसैनिकांवर पक्षपातीपणे कारवाई करत आहे, असा आरोप विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे यांनी केला. मुंबईत ठाकरे गटाच्या निकटवर्तींयावर ईडीने टाकलेल्या धाडी प्रकरणावर ते मुंबईत माध्यमांशी बोलत होते. कोविड काळात आमच्याबरोबर जे लोक काम करत होते. त्यातील काही लोक आता शिंदे गटात गेले आहेत. मग त्यांची चौकशी का होत नाही. ही कारवाई केवळ पक्षपातीपणे केली जात आहे. मुंबई पाठोपाठ राज्यातील ठाणे, पुणे, नागपूरसह सर्व ठिकाणी कारवाई झाली किंवा चौकशी झाली पाहिजे, पण तसे होत नाही, केवळ दुजाभाव केला जात आहे.

आम्ही शिवसैनिकांना अशा कारवाईचा फरक पडत नाही. आमचे नेते संजय राऊत यांच्यावर देखील अशी कारवाई झाली. त्याला आम्ही सामोरे गेलो आहोत. त्याची आम्हाला सवय झाली आहे, असे प्रतिपादन अंबादास दानवे यांनी केले. तर आम्ही याचा सामना करू असेही ते म्हणाले.
कोविड काळात तर देशपातळीपासून सगळीकडे चौकशी व्हावी, कारण त्या काळात दोन पैसे कमी की जास्त हे महत्वाचे नव्हते. तातडीने जो सेवा देईल, त्याला महत्त्व होते. कोविड काळात ठाण्यात काय झाले हे सांगायची गरज नाही, आजही अनेक साहित्य खरेदी केलेले तसेच पडून आहे. किती गैरव्यवहार झाला, याची देखील चौकशी होणे गरजेजे आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम