ठाकरे अडचणीत : आदित्यच्या निकटवर्तीयांवर ईडीच्या धाडी !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । २१ जून २०२३ ।  महाविकास आघाडीची राज्यात सत्ता असतांना व कोरोना काळात लाईफलाईन कंपनीच्या कथित घोटाळा झाल्याचा आरोप केला जात आहे. याप्रकरणात भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी सुरज चव्हाण या आदित्य ठाकरेंच्या निकटवर्तीयाच्या मदतीने कोरोना काळात कोविड सेंटरचे कॉन्ट्रॅक्ट्स दिले गेले होते असा आरोप केला होता. दरम्यान आता या आरोपांची चौकशी करण्यासाठी आज, २१ जून रोजी मुंबईत १५ ठिकाणी ईडीने ही छापेमारी केल्याची माहिती मिळत आहे आहे. त्यामुळे पुन्हा एकदा ठाकरे अडचणीत येण्याची शक्यता वाढली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सुजित पाटकर घोटाळा प्रकरणात ईडीकडून ही कारवाई करण्यात आली आहे. सुजित पाटकर हे संजय राऊत यांचे निकटवर्तीय आहेत. कोरोना काळात लाईफलाईन कंपनीच्या कथित घोटाळा प्रकरणात ईडीकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यानंतर आता या प्रकरणात सनदी अधिकारी संजीव जैस्वाल यांच्या निवसस्थानी ईडीची धाड पडल्याची माहिती मिळत आहे. संजीव जैस्वाल हे मुंबई महापालिकेचे तत्कालिन अतिरीक्त आयुक्त होते.

ईडीची ऐकूण १५ ठिकाणी छापेमारी सुरू आहे. कोविड कथित घोटाळा प्रकरणातील फाइल्स ज्यांच्या मार्फत हाताळल्या गेल्या अशा महानगरपालिकेचे अधिकाऱ्यांचा यामध्ये समावेश आहे. संजीव जैस्वाल हे आधी ठाणे महापालिकेचे आयुक्त होते. त्यानंतर त्यांना मुंबई महापालिकेचे आतिरिक्त आयुक्त म्हणून नेमणूक मिळाली. त्यानंतर ज्या संदर्भात ईडी चौकशी करत आहे त्या कॉन्ट्रॅक्टमधील एक भाग संजीव जैस्वाल यांच्याकडे होता.

त्यांच्या डिपार्टमेंटकडून ही फाइल हाताळली गेली होती, त्यामुळे त्यांच्याकडून नेमकं काय घडलं आणि कॉन्ट्रॅक्ट्स कसे आणि का देण्यात आले यासंबंधी ईडीकडून माहिती घेतली जात आहे. एकूण १५ ठिकाणी आज सकाळी ७ ते ८ दरम्यान ही छापेमारी करण्यात आली आहे. आदित्य ठाकरे यांच्या निकटवर्तीयांच्या घरी चेंबूर, गोवंडी या ठिकाणी देखील छापे टाकण्यात आले असल्याची माहिती मिळत आहे. सुजीत पाटकर सोबतच इतर तात्कालीन मनपा अधिकारी तसेच आदित्य ठाकरे यांचे काही निकटवर्तीय यांच्या घरी छापेमारी केल्याचे बोलले जात आहे. ईडीने १५ ठिकाणी एकाच वेळी छापेमारी केले आहेत . संध्याकाळपर्यंत ईडीकडून याबद्दल अधिकृत माहिती दिली जाण्याची शक्यता आहे. त्यानंतरच ही छापेमारी का करण्यात आली हे स्पष्ट केलं जाईल.

 

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम