आयपीएल विजेत्याला मिळाले इतके कोटी !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । ३१ मे २०२३ ।   देशात गेल्या काही महिन्यापासून आयपीएलची लोकप्रियता झपाट्याने वाढत आहे. 2008 साली सुरू झालेल्या या लीगच्या प्रेक्षकसंख्येमध्ये झपाट्याने वाढ झाली आहे. बक्षिसांच्या बाबतीतही या लीगने वेगाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

BJP add

या लीगच्या प्रत्येक मोसमात, फ्रँचायझी मोठ्या रकमेची बोली लावून भारतातून आणि परदेशातील खेळाडूंना खरेदी करतात. त्याच वेळी हंगाम संपेपर्यंत, विजेत्या संघापासून ते साखळी फेरीत बाहेर पडलेल्या संघापर्यंत, त्यांना कोट्यवधी रुपये बक्षीस म्हणून मिळतात.
या लीगच्या पहिल्या दोन हंगामात विजेत्या संघाला 4.8 कोटी रुपये, तर उपविजेत्या संघाला 2.4 कोटी रुपये बक्षीस म्हणून देण्यात आले. गेल्या मोसमातील विजेत्या संघ गुजरात टायटन्सला 20 कोटी रुपये मिळाले होते. त्याचवेळी राजस्थान रॉयल्सला 13 कोटी रुपये बक्षीस म्हणून देण्यात आले होते.

आयपीएल 2023मध्ये कुणाला किती रक्कम मिळाली?
आयपीएल 2023 मध्ये एकूण 46.5 कोटी रुपये बक्षीस म्हणून दिले गेले. आयपीएल विजेत्या चेन्नई सुपर किंग्ज संघाला बक्षीस म्हणून 20 कोटी रुपये मिळाले. तर उपविजेत्या गुजरात टायटन्स संघाला 13 कोटी देण्यात आले. शिवाय तिसऱ्या क्रमांकावरील मुंबई इंडियन्स संघाला 7 कोटी आणि चौथ्या क्रमांकावरील लखनऊ सुपरजायंट्स संघाला 6.5 कोटी रुपये देण्यात आले. ऑरेंज कॅप विजेता शुबमन गिल आणि पर्पल कॅप विजेत्या मोहम्मद शमीला प्रत्येकी 15 लाख रुपये मिळाले. अंतिम सामन्यातील सामनावीर डेवॉन कॉनवेला 5 लाख रुपये देत कौतुकाची थाप मारण्यात आली.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम