भारतावरील कर्ज माफ होणार आहे का? संजय राऊतांची जोरदार टीका !
बातमीदार | ९ सप्टेंबर २०२३
जगभरातील महत्वाच्या देशांचे प्रमुख राजधानी दिल्लीत G20 परिषद होत असल्याने या परिषदेसाठी आले असून इथं विविध मुद्द्यांवर चर्चा होणार आहे. यावर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी टीका केली आहे. G20 परिषदेसाठी सर्व राष्ट्रांचे प्रमुख दिल्लीत आले आहेत. परंतु ज्यांनी आपली जमीन दिली आहे ती परत मिळणार आहे का? भारतावरील कर्ज माफ होणार आहे का? या परिषदेसाठी किती खर्च झाला आहे? आंतरराष्ट्रीय स्तरावर अशा बैठका महत्त्वाच्या असतात. मोदींनी ते केलेलं आहे. पण हे पहिल्यांदाच घडत नाहीये. तर पंडीत जवाहललाल नेहरू, इंदिरा गांधी पंतप्रधान असताना देखील अशा प्रकारच्या बैठका झालेल्या आहेत. G20 परिषद आहे की, मोदी 20-20 आहे? असा प्रश्न सर्वांना पडतोय, असं संजय राऊत म्हणालेत.
आज आपल्या भागावर चीनने अतिक्रमण केलं आहे. परंतु चीनचे राष्ट्राध्यक्ष मिस्टर पुतिन इथं आलेले नाहीत, हे लक्षात घ्या. शेवटी या परिषदेतून काय मिळणार आहे?, याकडे आमचंही लक्ष आहे. लडाखमध्ये गेलेली अर्धी जमिनी ती परत मिळणार असेल तर आम्ही बैठकीचा स्वागत करू. या बैठकीमुळे जर भारताची ताकद वाढलेली असेल तर त्याचं स्वागत नक्की करू, असंही संजय राऊत म्हणाले.
G20 मध्ये लोकशाहीची फार मोठी तुतारी वाजवण्यात येतेय. परंतु जे जेवणावळीचे कार्यक्रम झाले. त्या ठिकाणी विरोधी पक्ष नेते मल्लिकार्जुन खरगे यांना बोलवलं नाही. जी पुस्तिका दिली त्यात भारत कसा लोकशाहीचा जनक आहे. जननी आहे, असं सांगितलं गेलं. परंतु त्यात संसदेतील विरोधी पक्षाच्या प्रमुख नेत्यांना स्थान नसेल तर ती जननी ही वांझ केली जात आहे, असा गंभीर आरोपही संजय राऊत यांनी केला. राज्यकर्त्याचं मन मोठं असावं लागतं. तुम्ही तुमच्या विरोधी पक्ष नेत्याचा द्वेष करत आहात. हे चुकीचं आहे, असंही त्यांनी म्हटलं.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम