सरकारचा स्पेशल लिफाफा फेल ; उपोषण सुरूच !

बातमी शेअर करा...

बातमीदार | ९ सप्टेंबर २०२३ | मराठा कार्यकर्ते मनोज जरांगे यांचं गेल्या 12 दिवसांपासून उपोषण सुरु आहे. मराठवाड्यातील मराठ्यांना सरसकट कुणबी जातीचं जात प्रमाणपत्र देण्यात यावं, अशी त्यांची प्रमुख मागणी आहे. त्यांच्या मागणीनुसार राज्य सरकारने जीआरदेखील काढला. पण यामध्ये जुन्या वंशावळचीचा कुणबी असा उल्लेख असल्याने जरांगे पाटील यांनी आपलं उपोषण चालूच ठेवलं. जरांगे यांनी या जीआरमध्ये दुरुस्ती सुचवली होती.

शिवसेना नेते अर्जुन खोतकर सरकारचा एक लिफाफा घेऊन जालन्यातील अंतरवली सराटी गावात दाखल झाले. तो लिफाफा अर्जुन खोतकर यांनीदेखील उघडला नव्हती. मनोज जरांगे यांच्या उपोषणस्थळी तो लिफाफा उघडण्यात आला. त्यामुळे मनोज जरांगे आज उपोषण मागे घेणार की काय? असा प्रश्न निर्माण झाला होता. पण मनोज जरांगे यांनी भूमिका मांडत महाराष्ट्रातील मराठा समाजाला सरसकट कुणबी-मराठा प्रमाणपत्र मिळत नाही तोपर्यंत उपोषण मागे घेतलं जाणार नाही. हे आमरण उपोषण सुरु राहील, असं मनोज जरांगे पाटील यांनी स्पष्ट केलं. सरकारच्या जीआरमध्ये किरकोळ दुरुस्ती राहिली आहे, अर्जुन खोतकर उद्या दुरुस्ती करुन पुन्हा येतील, असा विश्वास जरांगे पाटील यांनी व्यक्त केला.

शिवसेना नेते अर्जुन खोतकर यांनी दुरुस्ती सुचवण्यासाठी जरांगे यांना मुंबईत बैठकीसाठी येण्याचं निमंत्रण दिलं होतं. त्यावर जरांगे यांनी आपलं शिष्टमंडळ पाठवून असं सांगितलं होतं. त्यानुसार जरांगे पाटील यांच्या शिष्टमंडळाची काल मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बैठकही पार पडलीय. या बैठकीला जरांगे पाटील फोनच्या माध्यमातून जालन्यातून उपोषणस्थळाहून उपस्थित होते. ते बैठकीतील मुद्दे लिहून घेत होते.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम