हे शहर आहे की डान्सबार?; राज ठाकरेंची टीका !

बातमी शेअर करा...

बातमीदार | २१ ऑक्टोबर २०२३

जगभरात आज आर्किटेक्ट दिन मोठ्या प्रमाणात साजरा होत असतांना पुण्यातील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ आर्किटेक्टमध्ये राज ठाकरे यांची प्रकट मुलाखत घेण्यात आली. यावेळी शहरांच्या सौंदर्यीकरणावरुन त्यांनी सताताधाऱ्यांवर बोचऱ्या शब्दांत निशाणा साधला. तसेच, मुंबई बरबाद व्हायला एक काळ जावा लागला. मात्र, आताच लक्ष दिले नाही तर पुणे बरबाद व्हायला वेळ लागणार नाही, असा इशाराही राज ठाकरे यांनी दिला.

मुंबईतील रस्त्यांवर शासनाकडून लाईटिंग करण्यात आली आहे. मात्र, हे लाईट अशा प्रकारे लावण्यात आले आहे की सालं कळतंच नाही हे शहर आहे की डान्सबार?, अशा शब्दांत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी शासनाच्या सजावटीवर खोचक टोला लगावला.

मुलाखतीत राज ठाकरे म्हणाले, मुंबईच्या शिवाजी पार्कात सिंह आहेत. त्या सिंहाना खालून लाल दिव्यांचा प्रकाश मारला आहे. ते पाहताना सिंहाला मूळव्याध झाला की काय असे वाटते. असे कधी सौंदर्यीकरण असते का? सौंदर्यीकरणाच्या नावाखाली सध्या काहीही करणे चालू आहे. बरे हे करणारे नगरसेवक, आमदार अभ्यासगट म्हणून परदेश दौऱ्यावर जातात. तिथे काही बघत नाही का? तिथल्या शहराचा विकास दिसत नाही का? बरे जमत नसेल तर अरबांसारखं तरी वागा. त्यांच्याकडे मेंदू नाही, पैसे आहेत. त्यामुळे मेंदू विकत घ्या. इतर लोकांना बोलवा आणि कामे करून घ्या, असा सल्लाही राज ठाकरेंनी दिला.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम