महिलेसोबत रेल्वेत झाले असे ; नवजात बाळाचे नाव ठेवले ‘नाशिक’ !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । १० मार्च २०२३ । प्रत्येक महिला नेहमीच नामांकित हॉस्पिटलमध्ये प्रसती व्हावी असा विचार असतो पण काही वेळेस अशी संधीच येत नाही कि आपण हॉस्पिटलमध्ये जावे लागेल अशीच एक घटना घडल्याने अवघ्या राज्याच्या रेल्वे विभागात या घटनेचे चर्चा होत आहे. त्याच्या मागचं कारण सुद्धा तितकेच खास आहे. नुकतेच एका नवजात बाळाचे नामकरण झालं आहे. त्याचं झालं असं, की मुंबईहून नेहमीप्रमाणे सेवाग्राम एक्सप्रेस धावू लागली होती. नाशिक स्टेशन जसं जसं जवळ येऊ लागलं तसं तसं एका महिलेला प्रसूतीकळा येऊ लागल्या. महिलेसोबत असलेल्या महिला तशा घोळका करूनच बसलेल्या होत्या, मात्र प्रसूती कळा सुरू होताच त्यांनी महिलेला रिंगण केले.

ही संपूर्ण लगबग जनरल डब्यात सुरू होती. त्याच वेळेला काही प्रवाशांनी दुसरीकडे प्रार्थना सुरू केली. महिलेसह बाळ सुरक्षित राहू देत. एकीकडे प्रसूती कळा सुरू असल्याने महिला जोरजोरात ओरडत होती, आणि दुसरीकडे प्रार्थना सुरू होती. त्यामध्ये जवळपास नाशिकरोड स्टेशन निघून गेले.

त्यानंतर महिलेने एका गुटगुटीत बाळाला जन्म दिला. आणि संपूर्ण डब्यात बाळ जन्मला आले म्हणून आनंदाचे वातावरण झाले. टाळ्यांचा कडकडाट झाला. महिलेसह बाळ सुरक्षित असल्याने त्यांनी कुठल्याही स्टेशनवर न उतरता आपला प्रवास सुरूच ठेवला. बाळाला दिलेली महिला आणि सोबत असलेल्या महिला या केटरिंगचे काम करत होत्या. मुंबईवरून त्यांचा प्रवास सुरू झाला होता. त्या यवतमाळकडे चालल्या होत्या. आणि त्याच दरम्यान ही प्रसूतीची घटना समोर आली आहे.

खरंतर संपूर्ण डब्यात आनंदाचे वातावरण होते. इतर प्रवाशांनी महिलेला विचारले आता बाळाचे नाव काय ठेवणार. महिलेने तात्काळ प्रश्न केला. आता कोणतं स्टेशन गेलं. प्रवाशांनी उत्तर दिलं नाशिक. महिलेने लगेच सांगून टाकलं बाळाचे नाव नाशिक ठेवू. खरंतर धावत्या रेल्वेत बाळाचा जन्म, आणि बाळाचे नामकरणही झाले. त्यामुळे बाळाचे नाव नाशिक ठेवल्याचे संपूर्ण प्रवासी डब्यात ही बाब समजली आणि प्रत्येक जण येऊन बाळाला पाहात होता आणि आपल्या परीने महिलेला मदत करत होता. कष्टकरी महिला असल्याने महिलेला प्रवाशांनी आर्थिक मदतही केली. त्यामुळे नामकरण होत असतांना प्रवाशांनी भेट स्वरूपात महिलेला पैसे दिले. एकूणच ही संपूर्ण घटना सेवाग्राम एक्सप्रेसमध्ये चर्चेचा विषय ठरली असून रेल्वेच्या वर्तुळातही जोरदार चर्चा होऊ लागली आहे. रेल्वेतील संपूर्ण वातावरणच बाळाच्या जन्मानंतर बदलून गेला. संपूर्ण रेल्वेत आनंदाचे वातावरण होते. त्यात नाशिक असं नाव ठेवल्याने अधिक चर्चा होऊ लागली आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम