“शरद पवार कधी कुणाला बाद करतील हे सांगता येत नाही ; ‘या’ मंत्र्याने केले सूचक विधान
दै. बातमीदार । २१ ऑक्टोबर २०२२ । राजकारणात कुणीही कुणाचा कायमचा शत्रू नसतो, तर शरद पवार हे कधी कुणाचा खेळ करतील हे आतापर्यत कुणीही सांगू शकलेले नाही असाच खेळ त्यांनी राज्याच्या राजकारणात शिवसेनेला बाद करण्यासाठी केला आहे का ? असाही प्रश्न उपस्थित होत असताना सत्ताधारांसोबत विरोधक निवडणुकीच्या एकाच व्यासपीठावर दिसले.
या निवडणुकीच्यानिमित्ताने राष्ट्रवादीचे अध्यक्ष असलेले शरद पवार आणि भाजपाचे नेते आशीष शेलार यांच्या गटाची युती दिसून आली. यापार्श्वभूमिवर बोलताना “शरद पवार कधी गुगली टाकतील आणि कुणाला बाद करतील हे सांगता येत नाही. आताची त्यांची गुगली उद्धव ठाकरेंना बाद करणारी आहे. असं वक्तव्य केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केलं आहे.
२०२४ च्या निवडणुकीमध्ये शरद पवार मोदींना साथ देतील असं आठवले म्हणाले आहेत. असं मोठं वक्तव्य आठवले यांनी केलं आहे. तसेच, पवारांनी या निवडणुकीमध्ये ठाकरेंना बाद करत फडणवीस आणि शेलारांबरोबर युती केली आहे. असही आठवले यावेळी म्हणाले. मुंबईत पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी हे भाष्य केलं आहे. शरद पवारांनी या निवडणुकीमध्ये शेलार आणि फडणवीसांच्या निकटवर्तीयांशी युती करुन उद्धव ठाकरेंना टाकली असल्याचेही आठवले म्हणाले.
शरद पवारांनी जी गुगली टाकली आहे त्यावरुन अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. तुम्ही जुने राजकारणी आहात. काय वाटतं तुम्हाला याबद्दल?” असा प्रश्न आठवलेंना विचारलं असता “शरद पवार कधी गुगली टाकतील आणि कुणाला बाद करतील हे सांगता येत नाही. आताची त्यांची गुगली उद्धव ठाकरेंना बाद करणारी आहे. त्यांनी या निवडणुकीमध्ये ठाकरेंना बाद करत फडणवीस आणि शेलारांबरोबर युती केली आहे,” असं उत्तर दिलं. त्याचप्रमाणे, “शरद पवार हे कधी गुगली टाकतील सांगता येत नाही. त्यांची गुगली उद्धव ठाकरेंना बोल्ड करणारी आहे,” असंही आठवले म्हणाले. यासोबतच, “काँग्रेस पक्ष खिळखिळा झालेला आहे. विरोधक अशक्त आहेत. अशावेळेस नरेंद्र मोदींना साथ देणं हेच राजकीय परिपक्वतेचा विचार होऊ शकतो. शरद पवारांनी क्रिकेटमध्ये खेळी केली आहे तशी राजकारणातही खेळतील,” असा विश्वास आठवलेंनी व्यक्त केला.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम