राज्यात ‘या’ तारखेला पाऊस पुन्हा बरसणार; शेतकऱ्यानी हे उपाय कराच

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । २७ ऑक्टोबर २०२२ । राज्यात परतीचा पावसाने घातलेल्या थैमानामुळे अनेक शेतकऱ्याचे हातात आलेले पिक गेले आहे पण येते काही दिवस थंडीचा जोर वाढणार असून शेतकऱ्यासाठी हि थंडी फार महत्वाची आहे, त्यानंतर मात्र पुन्हा पाऊस सुरु होणार असल्याची माहिती पंजाबराव डख यांनी दिली आहे.

राज्यात आता थंडीला देखील सुरुवात होणार आहे. वाढती थंडी शेतकऱ्यांसाठी फायद्याची राहणार आहे. सध्या शेतकरी बांधव खरीप हंगामातील पिकांची हार्वेस्टिंग करत असून बहुताशी ठिकाणी रब्बी हंगामातील पिकांची पेरणी सुरू झाली आहे.

अनेक शेतकरी बांधव सध्या रब्बी हंगामासाठी आवश्यक बी-बियाणांची आणि खतांची पूर्तता करण्यात व्यस्त आहेत. दरम्यान आपल्या हवामान अंदाजासाठी संपूर्ण महाराष्ट्रात चिरपरिचित व्यक्तिमत्व अर्थातच पंजाबराव डख यांचा हवामान अंदाज समोर आला आहे.

पंजाबराव डख यांनी वर्तवलेल्या आपल्या सुधारित हवामान अंदाजानुसार, राज्यात आता परतीच्या पावसाने विश्रांती घेतली आहे. यामुळे शेतकरी बांधवांना दिलासा मिळत आहे. मात्र असे असले तरी या महिन्याच्या शेवटी पावसाची शक्यता आहे. पंजाबराव यांच्या मते शेतकरी बांधवांनी 29 ऑक्टोबर पर्यंत आपल्या खरीप हंगामातील पिकांची हार्वेस्टिंग पूर्ण करून घ्यावी. राज्यात सध्या सोयाबीन मका तसेच इतर खरीप हंगामातील पिके काढणीसाठी तयार झाली आहेत. अशा परिस्थितीत शेतकरी बांधवांनी या पिकांची काढणी करून घ्यावी. कारण की 30 ऑक्टोबर च्या आसपास राज्यात पावसाची शक्यता आहे.

निश्चितच शेतकरी बांधवांना आता 29 ऑक्टोबर पर्यंत आपल्या पिकांचे हार्वेस्टिंग पूर्ण करून पिके सुरक्षित ठिकाणी साठवणे आवश्यक राहणार आहे. ज्या शेतकरी बांधवांची पिकांची हार्वेस्टिंग पूर्ण झाली असेल त्यांनी मळणीची कामे करून घ्यावीत. तसेच शेतकरी बांधवांनी रब्बी हंगामासाठी आवश्यक पूर्व मशागतीची कामे देखील आता आटपायला सुरुवात केली पाहिजे. दरम्यान पंजाबराव यांच्या मते आता राज्यात थंडीचा जोर वाढणार आहे मात्र 30 ऑक्टोबरच्या आसपास पुन्हा एकदा पाऊस होणार असल्याने शेतकऱ्यांना काळजी घेण्याची आवश्यकता आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम