ज्येष्ठ दिग्दर्शक इस्माईल श्रॉफ यांचे निधन

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । २७ ऑक्टोबर २०२२ । बॉलिवूड इंडस्ट्रीमधील ज्येष्ठ दिग्दर्शक इस्माईल श्रॉफ यांचे वयाच्या ६२ व्या वर्षी निधन झाले. मुंबईतील कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात बुधवारी रात्री म्हणजेच 26 ऑक्टोबर रोजी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. इस्माईल हे बऱ्याच दिवसांपासून आजारी होते. इस्माईल यांच्या जाण्याने शोककळा पसरली आहे.

अभिनेता गोविंदा यांनी इस्माईल श्रॉफ यांच्या ‘लव्ह 86’ चित्रपटातून पदार्पण केले होते. ई-टाइम्सशी बोलताना गोविंदा म्हणाले, ‘या बातमीने मला खूप दु:ख झाले आहे. माझ्या करिअरची सुरुवात त्यांच्यापासून झाली होती. देव त्यांच्या आत्म्याला शांती देवो.’ अशा शब्दांत गोविंदा यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. गोविंदा पुढे म्हणाले, ‘त्यांनी मला फक्त काम दिले नाही. तर त्यांचा माझ्यावर विश्वास होता. माझ्या आयुष्यातील ते पहिले असे माणूस होते, ज्यांनी गोविंदाला सिनेमाची समज असल्याचे सांगितले. मला गोविंदा बनवण्यात त्यांचा मोठा वाटा आहे,’ असे ते म्हणाले.

शोक व्यक्त करताना अभिनेत्री पद्मिनी कोल्हापुरे म्हणाल्या, ‘मी त्यांच्यासोबत ‘थोडीसी बेवफाई’ आणि ‘आहिस्ता आहिस्ता’मध्ये काम केले आहे. ‘आहिस्ता आहिस्ता’ हा चित्रपट माझ्या हृदयाच्या खूप जवळ आहे. अर्थात ते आपल्या कामाबाबत खूप कडक होते, पण त्यांचा चेहरा नेहमी हसरा असायचा. ते जे ठरवायचे, त्याला पूर्णत्वास न्यायचे. कलाकार-दिग्दर्शक या नात्याने आमचे खूप छान जमायचे. ते अतिशय संवेदनशील दिग्दर्शक होते. इंडस्ट्रीत त्यांनी आपली छाप सोडली आहे,’ असे पद्मिनी म्हणाल्या.

इस्माईल यांचे अनेक चित्रपट सुपरहिट
इस्माईल यांचे खरे नाव एस.व्ही. इस्माईल होते, पण इंडस्ट्रीत ते इस्माईल श्रॉफ या नावाने ओळखले जात होते. त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत अनेक सुपरहिट चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे. त्याच्या सुपरहिट चित्रपटांमध्ये ‘आहिस्ता आहिस्ता’, ‘बुलंदी’, ‘थोडी सी बेवफाई’, ‘सुर्या’ यासह अनेक चित्रपटांचा समावेश आहे. त्यांनी राजेश खन्ना, धर्मेंद्र, राज कुमार, गोविंदा, शबाना आझमी आणि पद्मिनी कोल्हापुरे या कलाकारांसोबत काम केले.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम