गुजरातमध्ये जग्वारने सुमारे २५ जणांना चिरडले !
दै. बातमीदार । २० जुलै २०२३ । देशात पावसाचा हाहाकार सुरु असतांना गुजरातमधील अहमदाबादमधील इस्कॉन ब्रिजवर बुधवारी रात्री उशिरा जग्वारने सुमारे २५ जणांना चिरडले. या दुर्घटनेत ९ जणांचा मृत्यू झाला, तर १५ जण जखमी झाले. मृतांमध्ये एक पोलीस हवालदार आणि एका होमगार्डचाही समावेश आहे. धडक इतकी जोरदार होती की लोक 30 फुटांपर्यंत दूरवर पडले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महिंद्रा थार कार ओव्हरब्रिजवर मागून येणाऱ्या डंपरला धडकली होती. हा अपघात पाहण्यासाठी लोकांची गर्दी झाली होती. यानंतर राजपथ क्लबकडून ताशी 160 किलोमीटर वेगाने येणाऱ्या जग्वारने जमावाला चिरडले. मृतांमध्ये बोताड आणि सुरेंद्रनगर येथील तरुणांचा समावेश आहे. या घटनेत 6 जणांचा जागीच मृत्यू झाला, तर इतरांना सोला सिव्हिलमध्ये उपचारासाठी नेण्यात आले. या अपघातात जग्वारचा चालकही जखमी झाला आहे. त्यांना सिम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
जग्वारमध्ये दोन मुले आणि एक मुलगी असल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यांच्याबद्दल अधिक माहिती अद्याप समोर आलेली नाही. यावेळी उपस्थित संतप्त लोकांनी त्यांना मारहाणही केली. मात्र, काही लोकांनी त्यांना वाचवून रुग्णालयात पाठवले. कारमध्ये बसलेली तरुणी घटनास्थळावरून गायब झाली.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम