जळगाव : पोलीस कॉन्स्टेबलपदाच्या परीक्षेत दोन उमेदवारांनी वापरला ब्लूटूथ
बातमीदार | १९ नोव्हेबर २०२३
राज्यातील गुन्हेगारी गेल्या काही महिन्यापासून सातत्याने वाढ होत असतांना नुकतेच दिल्ली पोलीस कॉन्स्टेबल या पदासाठी ऑनलाइन परीक्षा सुरु असताना दोन विद्यार्थी ब्लूटूथचा वापर करत असल्याचे आढळून आले आहे. हि घटना दि.१७ रोजी धरणगाव येथे घडली आहे. याप्रकरणी जळगाव जिल्ह्याचे परीक्षा प्रमुख यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दोन्ही परिक्षार्थींवर गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी त्यांना अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, एरंडोल येथे साई टेक्नाबाईट टीसीएस सेंटरवर दिल्ली पोलीस कॉन्स्टेबल या पदासाठी दि. १६ रोजी ऑनलाईन परीक्षा परीक्षा सुरू असतांना या परिक्षेसाठी हरियाणा येथून दोन उमेदवार आलेले होते. आशिष कुलदीप दहिया (रा. 162 मोहमदाबाद, जि. सोनपत हरियाणा), दीपक जोगिंदर सिंग (रा. सात दबरा 164 हिसार हरियाणा) असे दोन्ही परिक्षार्थींचे नाव आहे. परिक्षेदरम्यान सिंग आणि दहिया या दोन्ही परिक्षार्थींनी कानामध्ये ब्लूटूथ उपकरण घातल्याचे तपासणीसाठी आलेल्या टीसीएस नागपूरचे परीक्षा प्रमुख सचिन पाटील यांच्या निदर्शनास आले. यानंतर पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीनंतर एरंडोल पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन शिरसाट व हेड कॉन्स्टेबल योगेश सोनवणे हे करीत आहेत. दोन्ही परिक्षार्थींना रात्री उशिरा अटक केली. त्यानंतर त्यांना न्यायालयात हजर केले. न्यायालयाने दोघांनाही तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम