हजारो तरुणांना महापारेषण विभागात नोकरीची मिळणार संधी !

बातमी शेअर करा...

बातमीदार | १९ नोव्हेबर २०२३

राज्यातील विद्युत क्षेत्रात काम करणाऱ्या तरुणांना नोकरी करण्याची एक मोठी संधी उपलब्ध झाली आहे. त्यामुळे अनेक तरुणांना यातून नोकरी देखील मिळणार आहे. महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी अंतर्गत विविध रिक्त पदांची मोठी भरती केली जाणार आहे. या भरती अंतर्गत विद्युत सहाय्यक (पारेषण), वरिष्ठ तंत्रज्ञ, तंत्रज्ञ 1, तंत्रज्ञ 2 पदांच्या जागा भरण्यात येणार आहेत. वरील रिक्त पदांच्या एकूण 2541 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज 20 नोव्हेंबर 2023 पासून सुरु होतील. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 डिसेंबर 2023 आहे.

शैक्षणिक पात्रता –
विद्युत सहाय्यक (पारेषण) – राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद (NCTVT), नवी दिल्ली यांनी प्रदान केलेले वीजतंत्री या व्यवसायातील राष्ट्रीय शिकाऊ उमेदवारी प्रमाणपत्र धारक.
वरिष्ठ तंत्रज्ञ, तंत्रज्ञ 1, तंत्रज्ञ 2 – शिकाऊ उमेदवारी कायदा- 1961 अंतर्गत राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद, नवी दिल्ली यांनी प्रदान केलेले वीजतंत्री या व्यवसायातील राष्ट्रीय शिकाऊ उमेदवारी प्रमाणपत्र.

वेतनश्रेणी –

विद्युत सहाय्यक (पारेषण) –
अ) प्रथम वर्ष – एकत्रित मानधन रुपये 15000/- दरमहा
ब) द्वितीय वर्ष – एकत्रित मानधन रुपये 16000/- दरमहा
क) तृतीय वर्ष एकत्रित मानधन रुपये 17000/- दरमहा

वरिष्ठ तंत्रज्ञ – रू. 30810-1060-36110-1160- 47710-1265-88190
तंत्रज्ञ 1 – रू. 29935-955-34710-1060- 45310-1160-82430
तंत्रज्ञ 2 – रू. 29035-710- 32585-955-42135- 1060-72875

उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज सादर करावेत. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. उमेदवारांनी खाली दिलेल्या लिंक वरून अर्ज करावा. अर्ज सुरू होण्याची तारीख 20 नोव्हेंबर 2023 आहे. अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 10 डिसेंबर 2023 आहे. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम