जोडीदाराचा आजचा दिवस रोमँटिक जाणार ; आजचे राशिभविष्य !

बातमी शेअर करा...
बातमीदार | २७ ऑक्टोबर २०२३
मेष : आर्थिक नुकसान होऊ शकते. आज तुम्ही केलेले चांगले कृत्य तुम्हाला तुमच्या प्रिय व्यक्तीसमोर चमकवेल. कामाच्या जागी विरोध होण्याची शक्यता असल्यामुळे चौकस रहा आणि निर्भयपणे वावरा. आपल्या कुठल्या मित्रांसोबत आज वेळ घालवू शकतात.
वृषभ : आर्थिक समस्यांचा सामना करावा लागू शकतो. घरातील सणांचे उत्सवाचं वातावरण तुमच्यावरील दडपण कमी करेल. तुम्ही केवळ बघ्याची भूमिका न बजावता त्या कार्यक्रमात जरूर सहभागी व्हा. तुमच्या नात्यातल्या सगळ्या तक्रारी आज निघून जातील. तुमच्यापुढे लग्नाचा प्रस्ताव आल्याने तुमचे ओझे कमी झाल्यासारखे वाटेल.
मिथुन : धन लाभ होण्याची पूर्ण शक्यता. वादविवाद, दुसऱ्यावर तोंडसुख घेणे आणि इतरांमधील दोष शोधत राहणे टाळा. अनेक दिवस प्रलंबित असणाऱ्या निर्णयांना अंतिम स्वरूप मिळेल आणि नवे संयुक्तिक प्रकल्प मार्गी लागतील. तुम्हाला आज सरप्राइझ मिळेल.
कर्क : आर्थिक खर्च वाढतील. आपल्या पालकांच्या आरोग्याकडे विशेष लक्ष देण्याची आणि काळजी घेण्याची गरज भासेल. जोडीदारासोबत भांडण करू शकतात. आज ऑफिसमध्ये तुम्हाला चांगले परिणाम मिळणार नाही. तुमचा कोणी खास आज तुमच्या समोर विश्वासघात करू शकतो.
सिंह : मर्यादेच्या बाहेर खर्च करू नका. रागावर नियंत्रण मिळवा. आजचा दिवस रोमँटीक असेल. कामातील अवघड टप्पा सहकाऱ्यांच्या वेळीच झालेल्या मदतीमुळे पार पडेल. त्यामुळे तुमची व्यावसायिक बाजू सांभाळणे, व्यावसायिक स्थान पुन्हा मिळविणे शक्य होईल.
कन्या : आर्थिक बचत करा. आपल्या जोडीदाराच्या आरोग्याकडे दुर्लक्ष केल्याचा तुमच्या नातेसंबंधावर परिणाम होऊ शकतो. कार्य क्षेत्रात तुमचा प्रतिद्वंदी आज तुमच्या विरुद्ध कट रचू शकतो. तुमचा स्पर्धात्मक स्वभाव तुम्हाला एखाद्याास्पर्धेत यश मिळवून देईल.
तूळ : कुटुंबाचा सल्ला तुमची आर्थिक स्थिती सुधारण्यात मदत करेल. जोडीदार/भागीदार तुम्हाला पाठिंबा देतील आणि मदतही करतील. कामाच्या ताणतणावांचे ढग अजूनही तुमच्या मनात साचल्यामुळे कुटुंब आणि मित्रमंडळींसाठी वेळ देता येणार नाही.
वृश्चिक : आर्थिक स्थिती चांगली. रागावर नियंत्रण ठेवा. स्वप्नील चिंता सोडून द्या आणि आपल्या रोमॅण्टीक जोडीदाराच्या सहवासाचा आनंद घ्या. भागीदारी तत्त्वावर नवीन व्यवसाय सुरू करायला चांगला दिवस. सर्वांनाच चांगला फायदा होऊ शकतो. पण भागीदारांशी करार करण्यापूर्वी पुन्हा एकदा विचार करा.
धनु  : दिवस भरत आलेल्या गर्भवती महिलांसाठी विशेष काळजीचा दिवस. कमिशन-लाभांश- किंवा मानधन याद्वारे फायदे मिळतील. या राशीतील व्यावसायिक आज कुणी जवळच्या लोकांच्या सल्ल्यामुळे समस्येत येऊ शकतात. जॉब करणाऱ्या जातकांना आज कार्य-क्षेत्रात विचार करून चालण्याची आवश्यकता आहे.
मकर : आर्थिक परिस्थिती थोडी बेताची होऊ शकते. एखाद्या इंटरेस्टिंग व्यक्तीची भेट होण्याचा संभव आहे. अनुभवी लोकांसाठी वेळ काढा आणि त्यांना काय म्हणायचे आहे हे जाणून घ्या. जोडीदार पुन्हा एकदा तुमच्या प्रेमात पडेल.
कुंभ  : कामाच्या ठिकाणचे वरिष्ठांचे दडपण आणि घरातील कलह तुमच्यावरील तणाव वाढवू शकतो. त्यामुळे कामावर लक्ष विचलित होईल. काही महत्त्वाच्या योजना मार्गी लागल्यामुळे आपणास नव्याने अर्थसहाय्य उपलब्ध होईल. जोडीदाराचा आज तुम्हाला त्रास होईल.
मीन  : आर्थिक दृष्टीने चांगला दिवस. या राशीतील विद्यार्थी आज मोबाइलवर संपूर्ण दिवस खराब करू शकतात. तुमच्यासाठी आजचा दिवस खूप रोमँटिक असेल, पण प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यावर विरजण पडेल.
बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम