जान्हवी घेणार साऊथमध्ये दमदार एन्ट्री !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । २५ जून २०२३ ।  नेहमीच सोशल मिडीयावर धुमाकूळ घालणारी अभिनेत्री जान्हवी कपूर नेहमीच आपल्या वेगळ्या लुकमुळे ओळखली जात असते. दाक्षिणात्य सुपरस्टार अभिनेता ज्युनिअर एनटीआर हा आता नव्या दमदार चित्रपटासह तयार आहे. त्याच्या बिग बजेट चित्रपटात बॉलीवुडचे नामांकित कलाकार मुख्य भूमिका साकारणार आहे. आरआरआर या सुपरहिट चित्रपटानंतर अभिनेता ज्युनिअर एनटीआर पुढच्या चित्रपटात झळकणार याबद्द्ल प्रेक्षकांमध्ये उत्सुकता लागली होती. आता त्याने आपल्या आगामी ‘देवरा’ चित्रपटाचे शुटिंग पूर्ण केले आहे. हा चित्रपट एक एक्शन ड्रामा असून यामध्ये एक्शन सीक्वेंस केनी बेट्स व वीएफएक्स ब्रैड मिनिच यांनी डिझाईन केले आहेत.

देवरा या आगामी चित्रपटात दाक्षिणात्य अभिनेता ज्युनिअर एनटीआर सोबत बॉलीवुडची धडक फेम अभिनेत्री जान्हवी कपूर प्रमुख भूमिकेत झळकणार आहे. या चित्रपटाद्वारे जान्हवी दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीमध्ये दमदार पदार्पण करणार आहे. यासोबत अभिनेता सैफ अली खानही या चित्रपटात काम करणार असल्याने प्रेक्षकांना चित्रपटाची उत्सुकता लागली आहे. चित्रपटाच्या टीमने काही शुटिंग हैदराबादमध्ये पूर्ण केले आहे.

काही महिन्यांपूर्वी जान्हवीने आपल्या ऑफिशियल इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन चित्रपटातील तिचा फोटो पोस्ट केला होता. या पोस्टरवरुन जान्हवीचे खूप कौतुक केले जात होते. पोस्टरमधील अभिनेत्री जान्हवीचे हावभाव आणि तिने परिधान केलेली साडी प्रेक्षकांना आवडली होती. मात्र यामध्ये चित्रपटाचे नाव ‘एनटीआर 30’ (NTR 30) असे दिसत असले तरी आता चित्रपटाचे नाव बदलून देवरा असे ठेवण्यात आले आहे. जान्हवी कपूरचा हा पहिलाच दाक्षिणात्य चित्रपट आहे. देवरा हा बहुचर्चित चित्रपट 2024 च्या 5 एप्रिलला रिलीज होणार आहे. या चित्रपटाचे पोस्टर रिलीज करण्यात आले आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन कोरटाळा शिवा यांनी केले असून मिक्किलीनेनी सुधाकर, कोसराजु हरी कृष्ण आणि नंदामुरी कल्याण राम यांनी निर्मिती केली आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम