मणिपूरात पुन्हा हिंसा ; महिलांनी केला जवानांवर हल्ला !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । २५ जून २०२३ ।  देशातील मणिपूरमध्ये गेल्या ५० दिवसांपासून जातीय हिंसाचार सुरू आहे. यादरम्यान मणिपूरमध्ये महिलांच्या एका गटाने लष्कराच्या सैनिकांवर हल्ला करत १२ कट्टरपंथियांची सुटाक केली. महिलांच्या नेतृत्वातील तब्बल १,५०० लोकांच्या जमावाने सुरक्षा दलाच्या जवानांना घेरल्याने जवानांनाना शनिवारी १२ कांगलोई यावोल कन्ना लुप (KYKL) च्या कट्टरपंथियांना नाईलाजाने सोडून द्यावे लागले. सैन्य अधिकाऱ्यांनी नाव न सांगण्याच्या अटीवर माध्यमांना याबद्दल माहिती दिली.

लष्कराच्या प्रवक्त्यांनी देखल या घटनेला दुजोरा दिला आहे. यामध्ये लष्कराच्या जवानांना शोधमोहिम राबवत असताना १२ केवाईकेएल सदस्यांना पकडले होते, त्यामध्ये मोइरंगथेम तम्बा उर्फ उत्तम देखील होता, जो २०१५ मध्ये घात लावून केलेल्या हल्ल्याचा मास्टरमाइंड होता, या हल्ल्यात तब्बल १८ जवानांचा मृत्यू झाला होता.

लष्कराच्या प्रवक्त्याने सांगितले की, दुपारी जवळपास २.३० वाजता विशेष गुप्त माहितीच्या आधारे कारवाई करताना इम्फाळ पूर्वेला इथम गावात सुरक्षा दलांनी एक ऑपरेशन सुरू केले होते. या ऑपरेशनमध्ये गावाची नाकेबंदी करण्यात आली होती. ज्यामध्ये १२ केवाईकेएल कॅडर्सना शस्त्रास्त्रे आणि दारुगोळ्यासह पकडण्यात आलं होतं. पकडलेले १२ लोकांपैकी एक हा २०१५ मध्ये झालेल्या डोगरा येथील घातपाती हल्ल्याचा मास्टरमाइंड, स्वघोषित लेफ्टनेंट कर्नल मोइरांघथेम तम्बा उर्फ उत्तम हा देखील होता. सेना अधिकाऱ्याने सांगितले की, थोड्याच वेळात महिला आणि स्थानिक नेत्यांच्या नेतृत्वात तब्बल १,२०० ते १,५०० लोकांचा जमावाने ऑपरेशन सुरु असलेल्या ठिकाणाला वेढा दिला आणि ऑपरेशन थांबवलं. महिलांची गर्दी आक्रमक होत असताना त्यांना ऑपरेशन सुरू ठेवू देण्याबाबत वारंवार विनंती करण्यात आली, मात्र त्याचा कुठलाही फरक पडला नाही. महिलांची आक्रमकता आणि परिस्थितीचं गांभिर्य ओळखून १२ केवायकेएल कट्टरपंथियांना सोडून देण्यात आलं. यादरम्या सुरक्षा दलाने स्फोटके आणि इतर शस्त्रात्र मात्र जप्त केली आहेत.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम