जानकरांचे मोठे विधान : त्रास झाल्यास बहिणीला घेवून जाणार !

बातमी शेअर करा...

बातमीदार | २३ सप्टेंबर २०२३ | राज्यातील भाजप पक्षामध्ये गेल्या काही महिन्यापासून पंकजा मुंडे नाराज असल्याच्या चर्चा जोर धरू लागल्या आहे. तर त्यांनी नुकतेच अनेक जिल्ह्यात दौरे देखील केले आहे. अशात राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी पंकजा मुंडेंविषयी एक मोठं वक्तव्य केलं आहे. त्यांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडालीये.

भावा-बहिणीच्या नात्याची आठवण करून देत पंकजा मुंडेंना आपल्यासोबत घेऊन जाणार अशा आशयाचं वक्तव्य महादेव जानकर यांनी केलं आहे. “पंकज मुंडे माझी बहिण आहे. आज ती एका जबाबदार पक्षाचं काम करतेय. ज्यावेळी बहिणीला खुप त्रास होईल तेव्हा तीला माहेरच्या झोपडीत मी घेऊन येईल.”, असं वक्तव्य महादेव जानकर यांनी केलंय.

राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर यांची जन स्वराज यात्रा आजपासून शिर्डी लोकसभा मतदारसंघात सुरू झाली आहे. राहाता तालुक्यातील कोल्हार येथील भगवती मातेच्या मंदिरात दर्शनाने या यात्रेला सुरूवात झाली आहे.

महादेव जानकर जन स्वराज्य यात्रेच्या निमित्ताने दोन दिवस शिर्डी लोकसभा मतदारसंघातील विविध गावात जाऊन नागरीकांशी संवाद साधणार आहेत. सत्ताधारी पक्ष किंवा विरोधी पक्षावर टीका करण्यापेक्षा आपण महाराष्ट्रासाठी काय करू शकतो. शेतकरी आणि सामान्यांचे काय प्रश्न आहेत हे जाणून घेण्यासाठी राज्यासह देशभर ही यात्रा सुरू असल्याचं महादेव जानकर यांनी म्हटलंय. पुढे आरक्षणाच्या मुद्द्यावर महादेव जानकर म्हणाले की, “मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळालं पाहीजे आणि धनगर समाजालाही आरक्षण हवं असेल तर समाजाचा डेटा तयार व्हायला हवा. समाजाचे तेव्हढे आमदार खासदार असतील तरच सरकार घाबरते असे जानकर म्हणालेत.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम