पंतप्रधान मोदींच्याहस्ते स्टेडियमच भूमिपूजन !

बातमी शेअर करा...

बातमीदार | २३ सप्टेंबर २०२३ | देशभरातील क्रिकेटप्रेमींसाठी एक मोठी बातमी समोर आली आहे. नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते आज नव्या क्रिकेट स्टेडियमच भूमिपूजन झालं. माजी क्रिकेटपटू कपिल देव, सुनील गावस्कर, सचिन तेंडुलकर, रवी शास्त्री, दिलीप वेंगसरकर आणि बीसीसीआय अध्यक्ष रॉजर बिन्नी, बीसीसीआय सचिव जय शाह यांच्यासह अनेक मोठ्या व्यक्ती या कार्यक्रमाला उपस्थित होत्या.

कार्यक्रमा दरम्यान सचिन तेंडुलकरने पीएम मोदी यांना NAMO लिहिलेली टीम इंडियाची जर्सी भेट दिली. “23 ऑगस्टला आपल्या चांद्रयान-3 च चंद्रावर यशस्वी लँडिंग झालं. तिथे एक शिवशक्ती स्थान आहे. इथे सुद्धा शिवशक्तीच स्थान आहे. काशीमध्ये आज इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियमच भूमिपूजन करण्यात आलं. हे क्रिकेट स्टेडियम एक वरदान ठरेल” असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. काशीमध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भूमिपूजन झालं. “युवकांसाठी हे स्टेडियम वरदान ठरेल. आज क्रिकेटच्या माध्यमातून जग भारताशी जोडलं जातय. या स्टेडियमच डिजाइन महादेवाला समर्पित आहे” असं पंतप्रधान मोदी म्हणाले.

वाराणसीच्या गंजारीमध्ये इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियम होणार आहे. आजच्या कार्यक्रमाला राज्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ सुद्धा उपस्थित होते. “वाराणसीला येऊन जी अनुभूती मिळते, त्याच शब्दात वर्णन करता येणार नाही” असं मोदी म्हणाले. “आधी लोक आपल्या मुलांना अभ्यास कर म्हणून सांगायचे. मुलांवर अभ्यासाचा दबाव असायचा. आज देशातील वातावरण बदललय. लोक आपल्या मुलांना खेळण्यासाठी पाठवतायत. जेव्हा एखाद क्रिकेट स्टेडियम बनतं, तेव्हा फक्त त्या खेळावरच नाही, तर अर्थव्यवस्थेवरही परिणाम होतो” असं पंतप्रधान मोदी म्हणाले. “राज्यातील युवकांनी क्रीडा क्षेत्रात प्रावीण्य मिळवावं, एवढीच माझी इच्छा आहे. वाराणसीतील युवकांना उच्चस्तरीय खेळाची सुविधा मिळाली पाहिजे” असं मोदी यांनी सांगितलं. या स्टेडियमच्या निर्मितीवर 450 कोटी खर्च येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ज्या क्रिकेट स्टेडियमच भूमिपूजन केलं, ते काम 2025 मध्ये पूर्ण होईल. त्रिशुलच्या आकराचे फ्लडलाइट्स लावले जातील. डमरुच्या आकाराच मीडिया सेंटर असेल. अर्धचंद्रकार छत असेल. 31.6 एकरमध्ये स्टेडियमची निर्मिती होईल. 30 हजार प्रेक्षक क्षमता असेल. स्टेडियममध्ये सात पीच बनवले जातील.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम