‘जवान’ चित्रपटाचा ट्रेलर रिलीज ; शाहरुखच्या भूमिकेने वेधले लक्ष !

बातमी शेअर करा...

बातमीदार | ३१ ऑगस्ट २०२३ ऑगस्ट महीन्याच्या सुरुवातीपासून बॉक्स ऑफिसवर गदर २ धमाल करीत असून या चित्रपटाने मोठा गल्ला देखील कमविला आहे. तर दुसरीकडे शाहरुख खानच्या ‘जवान’ चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. या चित्रपटात शाहरुख बाप आणि मुलाच्या भूमिकेत दिसणार असल्याचे या ट्रेलरवरून स्पष्ट झाले आहे. यामध्ये मुलगा वडिलांवर आणि लोकांवर झालेल्या अन्यायाचा बदला घेताना दिसणार आहे. शाहरुख व्यतिरिक्त यात विजय सेतुपती, नयनतारा, दीपिका पदुकोण आणि सान्या मल्होत्रा ​​यांच्यासह अनेक कलाकार दिसणार आहेत. 7 सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे.

ट्रेलरची सुरुवात शाहरुख खानच्या व्हॉईस-ओव्हरने होते, ज्यात तो म्हणतो.. .‘एक राजा था.. एक के बाद एक जंग हारता गया.. भूखा-प्यासा घूम रहा था जंगल में.. बहुत गुस्से में था।’ या चित्रपटाची पार्श्वभूमी अशी आहे जिथे शाहरुखच्या पात्राचे वडील आणि त्याचे संपूर्ण कुटुंब कोसळले आहे. यानंतर मुंबई मेट्रो कोणीतरी हायजॅक केल्याचे आणि पोलिस त्याच्याशी बोलणी करत असल्याचे दाखवण्यात आले आहे. यानंतर विजय सेतुपतीने साकारलेल्या मुख्य खलनायक कालीची एन्ट्री होते.

काली हा जगातील चौथा सर्वात मोठा शस्त्र विक्रेता आहे. कालीमुळे शाहरुखने त्याचे वडील आणि संपूर्ण कुटुंब गमावले आहे. ट्रेलरच्या शेवटी शाहरुख दुहेरी भूमिकेत खलनायकाशी लढताना दिसत आहे. येथे पिता-पुत्र दोघेही एकत्र शत्रूंचा बदला घेताना दिसणार आहेत.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम