जया बच्चन भडकल्या ; मी बहिरी नाहीच ; व्हिडीओ झाला व्हायरल !
दै. बातमीदार । २६ जुलै २०२३ । बॉलीवूड क्षेत्रामध्ये अनेक अभिनेते अभिनेत्री नियमित चर्चेत येत असतात पण बॉलीवूडच्या जेष्ठ अभिनेत्री जया बच्चन हे खूप कमी वेळेस चर्चेत येत असतात पण चर्चेत आले कि वादात अडकताना अनेकांनी त्यांना पाहिले आहे. त्यांच्या रागीटपणाच्या कित्येक गोष्टी प्रसिद्ध आहेत अशा जया बच्चन यांचा आणखी एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरुन नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहे. जयाजी यांना बऱ्याचदा चिडण्यासाठी कोणतेही कारण पुरते असे दिसून आले आहे. आता तर त्या एका कॅमेऱामॅनवर संतापलेल्या दिसत आहेत.
यापूर्वी देखील जयाजी यांनी पत्रकारांवर आणि पापाराझ्झींवर आगपाखड केली आहे. त्यांना पत्रकारांनी प्रमाणापेक्षा जास्त प्रश्न विचारलेले आवडत नाही. एखादा तिकरस प्रश्न विचारल्यास त्यावर जयाजी बोलत नाही. पत्रकारांनी आग्रह केल्यावर मग रागावतात हे दिसून आले आहे. त्याची चर्चाही होती. खुद्द अमिताभ यांनी देखील काही मुलाखतींमधून जयाजी यांची ती गोष्ट मान्य केली आहे. त्याचे झाले असे की, रॉकी और रानी की प्रेम कहाणीचा मुंबईत प्रीमिअर होता. त्याला चित्रपटाची मोठी स्टारकास्ट हजर होती. जयाजी देखील आल्या होत्या. दोन दिवसांनी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. यावेळी काही पत्रकारांनी जयाजी यांना प्रश्न विचारण्यास सुरुवात केली. त्यामुळे त्यांचा संताप झाल्याचे दिसून आले आहे. त्यावर त्यांनी मी काही बहिरी नाही, मला ऐकायला येते आणि जरा आरामात प्रश्न विचारा. असे म्हटले आहे. जयाजी यांचा तो व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. जयाजी यांना पाहताच पत्रकार ओरडू लागले. त्यावर त्यांनी संतापून दिलेली प्रतिक्रिया अनेकांच्या चर्चेचा विषय आहे. त्या व्हिडिओमध्ये दिसून येते की, जयाजी या अभिषेकची वाट पाहत थांबल्या आहेत. त्यामुळे पापाराझ्झी सतत त्यांचे फोटो घेत होते. पापाराझ्झींनी त्यांना विनंती केली की, आम्हाला फोटो हवे आहेत.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम