कदम यांचे संजय राऊतांवर गंभीर आरोप !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । २४ फेब्रुवारी २०२३ । संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्यावर गंभीर आरोप केले. श्रीकांत शिंदे यांनी माझ्यावर हल्ला करण्यासाठी ठाण्यातील गुंड राजा ठाकूर याला सुपारी दिली आहे, असा आरोप राऊतांनी केला होता. याला प्रत्युत्तर रामदास कदम यांनी प्रत्युत्तर दिले. प्रसिद्धी मिळवण्यासाठी त्यांचे हे कारस्थान आहे. मात्र लवकरच संजय राऊत यांचा भंडाफोड करणार असल्याचा इशारा रामदास कदम यांनी दिला.

ज्यावेळी उद्धव ठाकरेंनी सामना वृत्तपत्राच्या संपादकपदी रश्मी ठाकरे यांची नियुक्ती केली. तेव्हा संजय राऊत यांनी रश्मी आणि उद्धव ठाकरे यांना अश्लील भाषेत शिव्या दिल्या होत्या, असा गौप्यस्फोट रामदास कदम यांनी केला आहे. शिवसेना नेते रामदास कदम खेड येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.

कदम म्हणाले, जेव्हा सामनाच्या संपादक पदी रश्मी ठाकरे यांची निवड झाली, तेव्हा संजय राऊत तुम्ही माझ्यासमोर उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे दोघांनाही शिव्या घातल्या होत्या. कदाचित तुम्ही हे विसरले असाल पण मी विसरलो नाही. आपल्या निष्ठेच्या विष्ठा कधीच झाल्या आहेत. आपण मुळात शिवसैनिकच नाहीत. ते तुम्हालाही माहीत आहे आणि मलाही माहीत आहे. रामदास कदम म्हणाले, संजय राऊत तुम्ही उसणे अवसान आणून जणू शिवसेना तुम्हीच वाचवत आहात, असा अविर्भाव दाखवून संपूर्ण महाराष्ट्राला आणि देशाला आपण फसवत आहात. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे नेहमी म्हणायचे की बाटगा अधिक कडवा असतो तोच कडवेपणा तुम्ही दाखवत आहात.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम