खान्देशचे आराध्य दैवत कानबाई मातेचा पुण्यात उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा !

बातमी शेअर करा...

बातमीदार | पुणे | महेंद्र पाटील 

पुणे जिल्ह्यातील चाकण येथे  खान्देश प्रतिष्टांन, खान्देश मित्र मंडळ, अखिल खान्देश फाऊंडेशन, खान्देश ऐकता मंच यांच्या  सामूहिक उपक्रमात  दोन दिवस कानबाई उत्सव साजरा करण्यात आला, त्यात दिनांक 27 रोजी कानबाई मातेची स्थापना करण्यात आली, नंतर दुपारी अहिराणी गीतांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला, त्यानंतर मान्यवर उपस्थित होते त्यांचे  सत्कार करण्यात आला.

चाकण मध्ये खान्देशचे डॉ.सागर पाटील व डॉ. राहुल महाजन यांचे आरोग्यम हॉस्पिटल तर्फे खान्देशी बांधवांना 500 टिशर्ट  देणात आले, त्यामुळे डॉक्टर राहुल महाजन यांनी मनोगत व्यक्त करतांना म्हटले की असे कुठलेही खान्देशी कार्यक्रम असतील तर आम्ही त्यासाठी कधीही मदतीला आवर्जुन उपस्थित राहणार. “मना देस खान्देश ” या उक्तीनुसार जमलेल्या तमाम खान्देशी बंधु-भगीनींना व चाकण वासियांना कानबाई माता उत्सवानिमित्त शुभेच्छा.  आज दिनांक 28 रोजी सकाळी मातेची भव्य थाटामाटात मिरवणूक काढण्यात आली, त्यात खान्देश चे अमळनेर तालुक्यातील श्रीकृष्ण ब्रासबंड  होता, चाकण मध्ये खान्देशी बँड नी धुमधडाक्यात मातेची मिरवणुक पार पडली.  या कार्यक्रमात खांदेशीं बांधव आणि स्रिया  मोठ्या संख्येने सहभागी झाले आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम